शेवगाव रोटरीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब चौधरी तर सेक्रेटरी पदी प्रा. किसनराव माने


शेवगाव रोटरीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब चौधरी तर सेक्रेटरी पदी  प्रा. किसनराव माने

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी शाखेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांची तर सेक्रेटरी पदी  प्रा. किसनराव माने  यांची निवड झाली आहे.  

नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ येत्या बुधवारी ( दि. २८ जुलै ) सायंकाळी सहा वाजता शहरातील शुभम मंगल कार्यालय येथे कोरोनाचे नियम पाळून संपन्न होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून  रेणूकामाता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव व  रोटरीचे सहप्रांतपाल मनिष अय्यर यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांचे पदग्रहण होईल.   या वेळी रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा,  इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. मनिषा लड्डा, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी , शासकिय ठेकेदार बाळासाहेब मुरदारे, माजी प्राचार्य दिलीप फलके,  प्रा. काकासाहेब लांडे, केदार मंत्री, डॉ. दिनेश राठी, डॉ. मयूर लांडे, अॅड. प्रसाद फलके, सुधाकर जावळे, मनेष बाहेती, प्रविण लाहोटी,प्रा.के. वाय. नजन, भागनाथ काटे, अॅड. अभिजित काकडे, डॉ. गणेश चेके, डॉ.आशिष लाहोटी, प्रा. अण्णासाहेब दिघे आदींसह रोटरी सदस्य या वेळी उपस्थित राहतील.

रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रिय समाजसेवी संघटना असून शेवगाव येथील शाखेची स्थापना  सहा वर्षांपुर्वी डॉ. संजय लड्डा यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या शाखेचे यंदा सहावे वर्ष आहे.  

दरवर्षी नवीन पदाधिका-यांना संधी देण्याची परंपरा रोटरीत आहे. गेल्या सहा वर्षांत रोटरी क्लबच्या माध्यमातून माध्यमातून शेवगाव बसस्थानकात कायमस्वरूपी पाणपोई व बगीचा ,शहरात वृक्षारोपण व ऑक्सिजन पार्कची उभारणी,कोरोना संकट काळात कोरोना वैद्यकिय सेवा तसेच योद्ध्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, नेत्रदान व अवयदान जनजागृती, जि. प. प्राथ. शाळांना मोफत ग्रंथालय भेट, खामगाव व रामनगर जि.प. प्राथ. शाळेसाठी एलईडी भेट,गो शाळेला मदत, वृद्धापश्रमाला भेट, भटक्यांसोबत दिवाळी व फराळ वाटप, कमीत कमी खर्चात शौचालय बांधणीस प्रोत्साहन, विषमुक्त भाजीपाला निर्मिती यासह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.रोटरीच्या समाजोपयोगी कार्याचा वसा वृद्धींगत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने रचनात्मक सामाजिक काम करण्याचा संकल्प नुतन शाखाध्यक्ष बाळासाहेब चौधरी  व सेक्रेटरी प्रा. किसनराव माने यांनी व्यक्त केला आहे.

----------------------------------------------------------------------

 दि. २६ जूलै २०२१

जाहिरात
Search
विडिओ
Recent News