शिक्षार्थ परिषद_सेवार्थ परिषद


शिक्षार्थ परिषद_सेवार्थ परिषद

गेली दीड वर्षे झाले शाळा बंद आहेत किंवा काही शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. परंतु ऑनलाईन पद्धतीने शिकताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .वस्ती भागातील गरीब विद्यार्थ्यांना तर ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षणाचा लाभ घेता येत नसल्याची वस्तुस्थिती जेव्हा समोर आली त्यावेळी या मुलांचे अभ्यासाशिवाय नुकसान होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रत्यक्ष काम करण्याचा चंग बांधला आणि वस्ती भागात जाऊन यांना शिकण्याची एक योजना आखण्यास सुरुवात केली आणि काही काळातच ही योजना पूर्णत्वास येऊन त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली अन याचेच *परिषद की पाठशाला* हे एक प्रारुप होय.


९ जुलै म्हणजे ABVP चा स्थापना दिवस पूर्ण जगभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच अनुषंगाने हा *परिषद की पाठशाला* उपक्रम गेल्या १ जुलै पासून पुण्यातील ताडीवाला रोड येथील वस्ती भागात राबविला जातोय या उपक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक दिवस पुणे स्टेशन नगरातील विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वस्ती भागात जाऊन ऊन, वारा, पाऊस याची तिळमात्रही शंका ,भीती मनात न बाळगता भूमिगत पातळीवर जाऊन गणित, भारतीय संस्कृती, इतिहास,भूगोल तसेच विज्ञानाचे वेगवेगळे सूत्र सोप्या पद्धतीने शिकवण्याचा आणि  या माध्यमातून *Rebuilding Nation with igniting minds* या ओळीचा अर्थ प्रत्यक्षात आणून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करताहेत. 

त्याच पद्धतीने दर रविवारी या वस्ती भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रवादी कल्पनांची पुस्तके वाटप करून अशाच प्रकारची वेगवेगळी मदत देखील ABVP चे कार्यकर्ते करताहेत. 

हे सर्व करत असताना यातील प्रत्येक कार्यकर्ता फक्त आणि फक्त सेवाभावी वृत्ती मनात ठेऊन आपल्याच मुलांच्या हितासाठी झटत आहेत हे पाहून वस्ती भागात राहणाऱ्या  पालकांचा आनंद देखील खऱ्या अर्थाने मावेनासा झालेला आपल्याला दिसून येतोय.दिवसेंदिवस या उपक्रमाला अतिशय जोरदार प्रतिसाद मिळतोय हे पाहून परिषदेच्या कार्यकर्त्यांना देखील उपक्रम निरंतर चालवण्यासाठी प्रेरणा मिळतेय. यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News