गवारवाडी येथिल सावंत कुटूंबियांचे घर पाडल्याबद्दल पोलीस उपायुक्त यांना निवेदन, चौकशी करण्याची उपयुक्तांची ग्वाही --राहूल डंबाळे


गवारवाडी येथिल सावंत कुटूंबियांचे घर पाडल्याबद्दल पोलीस उपायुक्त यांना निवेदन,  चौकशी करण्याची उपयुक्तांची ग्वाही --राहूल डंबाळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : पिंपरी (दि. 26 जुलै 2021) गवारवाडी (माण) येथिल ज्येष्ठ महिला बायडाबाई किसन सावंत यांचे राहते घर एमआयडीसीच्या अधिका-यांनी बेकायदेशीरपणे पाडले होते. या विषयी न्याय मिळावा म्हणून सावंत कुटूंबिय आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल डंबाळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (दि. 26 जुलै) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

        मात्र, तत्पुर्वी आंदोलनकर्त्यांनी राहूल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली बायडाबाई सावंत यांच्यासह पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांना निवेदन दिले. यानंतर भोईटे यांनी या घटनेविषयी माहिती जाणून घेतली. तसेच याचे गांभिर्य ओळखून या घटनेची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी करुन अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. अशी माहिती राहूल डंबाळे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. यावेळी अजय लोंढे, शिवशंकर उबाळे, माऊली बोराटे, मेघा आठवले, विशाल ओव्हाळ, अमोल डंबाळे आदी उपस्थित होते.

      या घटनेची पार्श्वभूमी सांगताना बायडाबाई सावंत यांनी सांगितले की, गवारवाडी माण येथिल माझे राहते चार खोल्याचे घर पोलिस आणि एमआयडीसीच्या अधिका-यांनी कोणतीही नोटीस दिलेली नसताना भर पावसात पाडून माझ्या कुटूंबाचा निवारा काढून घेतला. मला न्याय मिळावा यासाठी मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. मला व माझ्या कुटूंबाला न्याय मिळावा अशी मागणी मी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांच्याकडे केली होती. मला माझ्या आईकडून हि 3 गुंठे जमिन मिळाली असून 2010 सालापासून या जागेबाबत आमचा पुणे सत्र न्यायालयात दावा सुरु आहे. या जागेची दोन वेळा शासकीय मोजणी झाली असून हि जागा एमआयडीसीच्या हद्दीत येत नाही. याचा दस्त व मोजणी अहवाल आमच्याकडे आहे. 1993 साली माण ग्रामपंचायतीमध्ये 8 अ च्या उता-यानुसार नोंद आहे. तरी देखिल एमआयडीसीचे अधिकारी मला व माझ्या कुटूंबियांना नाहक त्रास देतात. याबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही बेकायदेशीरपणे आमचे घर पाडले आहे. मला न्याय पिंपरी चिचंवड आयुक्त देतील असा विश्वास आहे असेहि यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News