पुण्यातील शहर भाजप तर्फे भास्कर जाधव यांना जोडो मारो आंदोलन


पुण्यातील शहर भाजप तर्फे भास्कर जाधव यांना जोडो मारो आंदोलन

पुणे:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान चिपळूण येथील पूरग्रस्त भागाला भेट देताना  आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या गैरवर्तणुकीचे पडसाद उमटताना दिसताहेत, पुण्यातील शहर भाजप तर्फे भास्कर जाधव यांना जोडो मारो आंदोलन करण्यात आलं, डेक्कन येथील खंडूजीबाबा चौकात आंदोलन करण्यात आले, भास्कर जाधव यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली

राज्यात महाविकास आघाडीकडून महिलांचा अपमान सुरुच आहे , असा  आरोपही भाजपने केलाय. या आंदोलनाला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,भाजपचे नगरसेवक    प्रमोद कोंढरे, नगरसेवक धनंजय जाधव, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले काल चिपळूण मध्ये मुख्यमंत्र्यांना दोरा करावा लागला. गेले तीन दिवस तिथे जे नुकसान झाले आहे. तेथील भागाची सरकार कडून कोणतेही पंचनामे हे केले गेले नाहीत. आणि त्या चिपळूण मध्ये राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला आतापर्यंत सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

तेथील नागरिकांची अशी मागणी होती की मुख्यमंत्री आल्यावर आपल्याला मदत भेटेल. येथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सद्य परिस्थितीची माहिती सांगितली पण आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेचे प्रश्न न ऐकून तिच्यावरच ते ओरडले त्यांच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या निषेधार्थ आम्ही आज भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे यासाठी आम्ही आज भाजपच्या वतीने आंदोलन करत आहोत. हा प्रकार मुख्यमंत्र्यां समोर घडला एक गरीब महिला तिचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना सांगत होती असले मुख्यमंत्री महाराष्ट्राला नकोत. मुख्यमंत्री हे गप्प राहिले आम्ही या घटनेचा निषेध करतो असे जगदीश मुळीक म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News