कामगिरी चोख पण दाम नाही रोख!!शिरूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पगाराची बोंबाबोंब दोन महिण्यापासून का रखडले पगार कर्मचाऱ्यांत असंतोष्याचे वातावरण


कामगिरी चोख पण दाम नाही रोख!!शिरूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पगाराची बोंबाबोंब दोन महिण्यापासून का रखडले पगार कर्मचाऱ्यांत असंतोष्याचे वातावरण

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

     देशात नव्हे संपूर्ण जगात करोना संसर्ग विषाणूने थैमान घातलं असताना देखील शिरूर नगर परिषद कर्मचारी घरादारातील कुटुंबातील व्येक्तीची परवा न करता स्वत:चा जिव धोक्यात घालून करतात काम; मग का नाही मिळत त्यांना दाम ही शोकांतिका नाहीतर काय आहे.शिरूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पगाराची बोंबाबोंब तब्बल दोन महिण्यापासून पगार रखडले असल्याचे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.


      शिरूर शहरासह शहरातील उपनगरातील गल्ली बोळात दारोदार घन कचरा गोळा करण्यात फिरणारी घंटा गाडी व त्या घंटा गाडी सोबत असलेल्या कामगारांचे दोन महिण्यापासून पगार रखडले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सिद्धार्थ नगर येथील नागरिकांशी घन कचरा गोळा करताना व्यथा व्यक्त केली.

        घंटा गाडीचे चालक कादर शेख,कामगार दिलीप लोंढे, राजू चव्हाण यांनी व्यथा मांडली याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब ससाणे,,दत्तात्रय जगताप, कैलास रिटे, गोरख ससाणे सह अनेक नागरिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News