करोना.. करोना.. करोना...! हे गाणे नाही जीव घेणा रोग आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी घ्या


करोना.. करोना.. करोना...! हे गाणे नाही जीव घेणा रोग आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी घ्या

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे ) आपल्याला माहित आहे की, सर्दी, खोकला,थंडी-ताप याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करु नका अशा किरकोळ समजणाऱ्या आजराला अंगावर काडू नका.जेंव्हा असे काहीही झालं तर आपल्या फेमिली डॉक्टरला किंवा अन्य तन्य डॉक्टरांना जाऊन भेटा त्याचे निदान करून घ्यावे असे आव्हान शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पंकज कुंवर आणि मा.शहराध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,शिरूर तसेच अखिल भारतीय माहिती सेवा समिती शिरूर शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांनी केले.

            करोना या रोगचा प्रारदुर्भाव अजूनही सपंलेला नाही याकडे आपल्या व आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविडसिन व कोविडसीड या दोन्ही लस उपलब्ध आहेत मात्र लसीकरणाचे सत्र असताना महत्वपूर्ण माहिती सदर लसीचा वापर पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहे अशाच लाभार्थी व्यक्तीला मिळणार दुसरा डोस दिला जाईल असेही माहिती देताना शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पंकज कुंवर यांनी सांगितले.

            पहिली लस घेतल्या नंतर दुसरी लस घेण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी होता पण हे गणित उलट झालं 48 च्या विरुद्ध 84 असा करण्यात आला असला तरी ती लस घेणे गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस या करोनाचा संसर्ग इतका वाढत चला की तो शहरापुरता राहिला नसून तो खेडपाड्यात देखील वाढत असल्यामुळे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पंकज कुंवर यांनी कोविड सेंटर येथून दिलेल्या माहिती नुसार नागरिकांना एकच आव्हान करतो की गरज असेल तर घर सोडा घर सोडताना स्वतःची काळजी घ्या. तोंडाला मास्क लावा. सॅनिटायजरचा वापर करा.अनाठाई इतर कोठेही फिरू नका.नाहक पोलिसांच्या कारवाईस बळी पडू नका. मा.शहराध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,शिरूर तसेच अखिल भारतीय माहिती सेवा समिती,शिरूर शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांनी आव्हान केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News