विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची संघटीत गुन्हेगारीवर विशेष मोहीम,बारामती पोलीसांची 17 टोळीतील 74 जणांवर हद्दपारीची कारवाई


विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची संघटीत गुन्हेगारीवर विशेष मोहीम,बारामती पोलीसांची 17 टोळीतील 74 जणांवर हद्दपारीची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी संघटीत गुन्हेगारी वर वचक बसविण्यासाठी विशेष मोहीम राबवली असून जनतेवर दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना दिल्या आहेत,त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे,बारामती तील कुप्रसिद्ध गुन्हेगार लाला पाथरकर याच्यावर कारवाई करून त्याला येरवडा जेल येथे स्थानबद्ध केल्याची माहिती प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली आहे,लाला पाथरकर हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2001 पासून खून,खुनाचा प्रयत्न, गर्दी जमवणे,मारामारी सह दुखापत, बेकायदा शस्र बाळगणे,खंडणी साठी अपहरण,सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे 18 गुन्हे दाखल आहेत,त्यानुसार त्याच्यावर 2017 साली बारामती शहर पोलिसांकडून मु पो का क 56 प्रमाणे एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती, ही कारवाई सुरू असताना देखील बारामती शहरात जबरी चोरी,गर्दी मारामारी असे गुन्हे केलेले आहेत, त्यामुळे 2019 मध्ये मु पो का क 55 प्रमाणे तीन महिन्यासाठी लाल्याला हद्दपार करण्यात आले नहोते,याकाळात देखील त्याने बारामती शहरात गुन्हे केले आहेत, त्याच्या दहशतीमुळे अनेक लोकांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी दिलेल्या नाहीत 

  सराईत गुन्हेगार हे अशिक्षित, बेरोजगार, व्यसनी तरुणांना हाताशी धरून टोळी तयार करून कमी वेळात विना कष्ट जास्त पैसे कमविण्यासाठी गल्ली बोळात छोटे मोठे भाऊ दादा भाई निर्माण होतात आणि ते सराईत गुंडांच्या आश्रयाखाली परिसरातील जनतेला विनाकारण त्रास देतात अशा टोळक्यावरच कारवाईचा बडगा उगारला असून सराईत गुंडापासून उगम पावणाऱ्या टोळक्याना परिसरातून हद्दपार करण्याची विशेष मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे,विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी अक्टोबर 2020 पासून आतापर्यंत मु पो का क नुसार 17 टोळीतील 74 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे तर 12 टोळीतील 65 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे,तसेच भिगवण, आळेफाटा, राजगड, शिरूर या पोलीस स्टेशन हद्दीतील बाळा उर्फ जगदीश पोपट दराडे, आप्पा ज्ञानदेव माने,राहुल अर्पण भोसले तसेच निलेश उर्फ नानू उर्फ नाना चंद्रकांत कुर्लप या आरोपींच्या संघटीत गुन्हेगारी आळा घालण्यासाठी 4 टोळ्यातील 31 जणांवर मोका अंतर्गत कारवाई गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तसेच निलेश बन्सीलाल घायवळ,गजानन पंढरीनाथ मारणे याच्यावर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे,पुणे जिल्ह्यातील वाढत्या संघटीत गुन्हेगारी वर आळा घालण्यासाठी पोलीस कार्यरत झाले असून त्यांच्यावर हद्दपार,मोकाअंतर्गत,स्थानबद्ध कारवाई करण्यात आली असून भविष्यात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे, ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या आदेशानुसार प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,सहा फौजदार शिवाजी निकम,दिलीप बरकडे,पो हवा गोपाळ ओमासे,पो ना अतुल जाधव,अंकुश दळवी,रुपेश साळुंखे, तुषार चव्हाण,अकबर शेख,दशरथ इंगोले,सुहास लाटणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय जगताप, सहा पोलीस उपनिरीक्षक तसेच पो हवाज्ञानेश्वर क्षीरसागर,हनुमंत पासलकर, चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News