अग्निपंख फाउंडेशनने बेलवंडी श्रीगोंदा ते सरडे फलटण 92 किमीचे सायकल वारी


अग्निपंख फाउंडेशनने बेलवंडी श्रीगोंदा ते सरडे फलटण 92 किमीचे सायकल वारी

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी = श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने बेलवंडी (ता. श्रीगोंदा ) ते सरडे ( ता. फलटण) ९२ किमीची सायकल वारी करुन  टोकियो मध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिक मध्ये तिरंदाजीत उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या  प्रविण जाधव  यांचे आई वडीलांना सलाम केला 

प्रविणचे सुवर्ण पदकाचे स्वप्न साकार होणेसाठी सामूहिक प्रार्थना केली. 

प्रविण जाधव हा गावकुसाबाहेर घर असलेला एका गरीब कुटुंबातील खेळाडू आहे. प्रविण अतिशय कठीण परिस्थितीवर मात करुन आॅलपिक च्या मैदानात उतरला आहे. यातुन प्रेरणेचे बीज तरुणाईत पेरली जावीत या भावनेने सायकल वारीचे आयोजन आले होते. यावेळी दक्षचे दत्ताजी जगताप दादासाहेब घोडेकर किसन वऱ्हाडे साळवे सर सरडेचे माजी सरपंच रामदास शेंडगे यांनी शुभेच्छा दिल्या. सायकल वारीचे लोणीव्यंकनाथ काष्टी गुंजखिळा बारामती येथे स्वागत करण्यात आले. 

राष्ट्रगीत आणि आनंदाश्रू 

 या दुर्लक्षित जिगरबाज खेळाडूच्या घरकुलासमोर तिरंगा ध्वजाला साक्ष ठेवत राष्ट्रगीताची धुन वाजली या वेळी या माता पित्याच्या आणि सरडे करांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय होता

कठोर परिस्थितीवर मात करून प्रविण जाधव सारखे खेळाडू आॅलंपिक स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी बाजी लावत आहेत ही अभिमानाची बाब आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी आॅलंपिकवीरांच्या मंदीरी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. शुभेच्छा 

ललीता बाबर आंतरराष्ट्रीय धावपटू 

 सहभागी सायकलपटू 

प्रेरणा सायकल वारीत ऋतुपर्ण साळवे रोहीत वऱ्हाडे यशार्थ साळवे कृष्णा साळवे हे शाळकरी मुल तसेच 

राजू साळवे  ज्ञानेशवर  हिवरकर दादा घोडेकर 

बाळासाहेब खामकर कैलास हिरवेे संदिप खलाटे अण्णा खामकर विलास  इधाटे बापू विशाल गव्हाणे वाजे  सकलेन शेख दीपक कोद्रे किशोर बिबे आढागळे कुमार लोखंडे किशोर बिबे बाळासाहेब काकडे सहभागी झाले होते. 

शुक्रवारी आष्टीची सायकल वारी

आष्टी येथील कृषी पुत्र अविनाश साबळे हा आॅलंपिक मध्ये ट्रीपल चेस ३ हजार मीटर मध्ये उतरला आहे त्याला शुभेच्छा  व अविनाशच्या माता पित्याने वंदन करण्यासाठी बेलवंडी (श्रीगोंदा) ते आष्टी सायकल वारीचे शुक्रवार दि २९ य रोजी आयोजन करण्यात आले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News