गुन्हेगारावर पोलिसांचा नाही राहिला वचक एका मागून एक चोरी मारीचे सत्र सुरु...?


गुन्हेगारावर पोलिसांचा नाही राहिला वचक एका मागून एक चोरी मारीचे सत्र सुरु...?

पत्रकार भाऊसाहेब खपके यांच्या क्रेनच्या चाकाची चोरी....बाबुराव नगर येथील षटकार कॉलनीत घडला हा प्रकार

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

      बाबुराव नगर येथील षटकार कॉलनीतील माऊली मोटर्स मल्टीकार सर्व्हिस येथील पत्रकार भाऊसाहेब खपके यांच्या क्रेनच्या चाकाची चोरी हा प्रकार रात्री एक वाजण्याच्या घडला असल्याचे दैनिक सार्वमातचे तालुका प्रतिनिधी पत्रकार भाऊसाहेब खपके यांनी सांगितले.

       बाबुराव नगर ( षटकार कॉलनी) शिरूर नामांकित माऊली मोटर्स मल्टीकार सर्व्हिस येथे वर्षानु वर्ष चालू असलेला व्यवसाय व समाजाची बांधील की जपत आपण समाजाचे काही तरी देणे या सदभावनेने सुरु केले असलेल्या पत्रकार भाऊसाहेब खपके यांच्या क्रेनच्या चाकाची चोरी हा प्रकार रात्री एक वाजण्याच्या घडला हा चोरट्यानी प्रकार करताना सि सी टीव्ही केमेराची  देखील  तोडफोड केली आहे तर माऊली मोटर्स मल्टीकार सर्व्हिस येथे कामानिमित्त सर्वच चार चाकी गाड्या येत असताना क्रेनच्या चाकाचीच चोरी झाली हा प्रकार पहिल्यांदा घडला असल्यामुळे गुन्हेगारावर पोलिसांचा  वचक राहिला नाही शिरूर शहरात एका मागून एक चोरी मारीचे सत्र सुरुच असल्याचे दैनिक सार्वमातचे पत्रकार भाऊसाहेब खपके यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News