नगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांसाठी प्रहार त्रिदल सैनिक संघ स्थापन करणार -आमदार बच्चुभाऊ ( ओमप्रकाश )कडु


नगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांसाठी प्रहार त्रिदल सैनिक संघ स्थापन करणार -आमदार बच्चुभाऊ ( ओमप्रकाश )कडु

राजेंद्र तासकर कोपरगाव प्रतिनिधी 


* ॥जय जवान जय किसान ॥ *


 * ॥सैनिक हिताय बहुजन सुखाय ॥ *


   प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक व संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हिताचे प्रश्न असो किंवा  दिव्यांग प्रश्न असो वाघासारखी डरकाळ्या फोडत त्याच्या मुळापर्यंन जाऊन त्या प्रश्नांचा निकाल लावल्याशिवाय न थांबणारे लोकनायक आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या  संकल्पनेतुन माजी सैनिकांच्या अनेक प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देशव्यापी नविन प्रहार त्रिदल माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात येत आहे .

     *लोकनायक आमदार बच्चुभाऊ कडू* यांच्या संकल्पनेतून आणि प्रगतशील शेतकरी तसेच यशस्वी उद्योजक संतोष जी पवार साहेब,उपाध्यक्ष प्रहार संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सैनिक विनोद सिंग परदेशी साहेब, अध्यक्ष प्रहार संघटना, अहमदनगर जिल्हा ,यांच्या अध्यक्षतेखाली व ऍडव्होकेट संजय शिरसाठसाहेब, माजी सैनिक अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य, यांच्या सहयोगाने देशव्यापी माजी सैनिकांच संघटन करून माजी सैनिकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी नवीन संघटना उदयास येत आहे, प्रहार त्रिदल सैनिक संघटना, महाराष्ट्र 

       तरी सर्व माजी सैनिकांनी या संघटनेत सक्रिय सहभाग घेऊन माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यास हातभार लावावा.व मार्गदर्शन करावे 

        तरी सर्व माजी सैनिकांनी येत्या  रविवार दिनांक 25/07/2021 रोजी वेळ सकाळी 10:00 वा. प्रहार करियर अॅकेडमी अहमदनगर, नगर औरंगाबाद,रोड हॉटेल मधुबन शेजारी, नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत नगर जिल्ह्यातील तमाम माजी सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सैनिक विनोद सिंग परदेशी व त्रिदल सैनिक संघांचे अध्यक्ष मा, ऍडव्होकेट संजय शिरसाठ यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

8805709899

विनोद सिंग परदेशी

9595054305

ऍड. संजय शिरसाठ

जाहिरात
Search
विडिओ
Recent News