गुरुपौर्णिमाचे ओचित्य साधून गौरव घुले यांनी केला शिक्षकांचा सत्कार


गुरुपौर्णिमाचे ओचित्य साधून गौरव घुले यांनी केला शिक्षकांचा सत्कार

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी पुणे:गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) हा हिंदू संस्कृती मधील अत्यंत पूज्य दिवस. या दिवसाचे औचित्य साधून युवा नेते श्री. गौरव  घुले यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या प्रभागातील तसेच शहरामधील आदरणीय शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. त्या मध्ये स्कूल, हायस्कूल, कॉलेज तसेच खाजगी  क्लास मधील शिक्षक यांचा सत्कार समारंभचा सोहळा पार पडला.

     बिबवेवाडी मधील विद्यानिकेतन स्कूल मध्ये गौरव दादा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.श्री.शेट्ये सर ,व सौ.शेट्ये मॅडम, यांचा सत्कार समारंभ गौरव घुले यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ट्रस्टी मेंबर व सर्व स्टाफ तर्फे गौरव दादा व मित्र परिवार यांचा सत्कार करण्यात आला. गौरवदादांच्या भावी वाटचालीस सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News