ॲड. अनिरुध्द कांबळे यांची कॉंग्रेस लीगल सेलच्या शहराध्यक्षपदी निवड


ॲड. अनिरुध्द कांबळे यांची कॉंग्रेस लीगल सेलच्या शहराध्यक्षपदी निवड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी; पिंपरी, पुणे (दि. 24 जुलै 2021) पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते ॲड. अनिरुध्द बलभीम कांबळे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस लीगल सेलच्या शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. आसिफ कुरेशी आणि सचिव ॲड. राहुल ढाले यांच्या सहिचे पत्र ॲड. कांबळे यांना पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.

    ॲड. अनिरुध्द कांबळे हे उच्चशिक्षित असून 2019 पासून नोटरी म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या वीस वर्षांपासून पुणे जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टीस करीत आहेत. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटीमध्ये ॲड. कांबळे यानी चिटणीस, सरचिटणीस, उपाध्यक्ष या पदांवर काम केले आहे. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते नुकतेच ॲड. अनिरुध्द कांबळे यांना पत्र देण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, युवक कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष मकरध्वज यादव आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News