गोपाळवाडी चोरमले वस्ती शाळेला ISO मानांकन, BDO अजिंक्य येळे यांनी भेट देऊन केले कौतुक


गोपाळवाडी चोरमले वस्ती शाळेला ISO मानांकन, BDO अजिंक्य येळे यांनी भेट देऊन केले कौतुक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी  :


गोपाळवाडी जिल्हा  परिषद शाळा आंगणवाडी केंद्र चोरमले वस्ती येथील आंगणवाडी शाळेला ISO मानांकन मिळाले आहे,दौंड तालुक्यातील गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चोरमले येथील आंगणवाडी शाळेला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आणि पंचायत समिती सदस्य विकास कदम यांच्या हस्ते 22/7/21 रोजी ISO प्रमाणपत्र आंगणवाडी सेविका रेखा डोंगरे व मदतनीस कल्पना उबाळे यांना देण्यात आले, यावेळी गटविकास अधिकारी यांनी शाळेची पहाणी केली टाकाऊ पासून टिकावू ही संकल्पना कशी सत्यात उतरू शकते हे त्यांनी तेथील खेंळणी पाहून त्यांचे कौतुक केले,शैक्षणिक साहित्य निर्मिती केल्यामुळे आणि आंगणवाडीतील उत्कृष्ट कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले,आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आंगणवाडी सेविका सौ रेखा तात्याबा डोंगरे यांना एक महिन्या पूर्वीच दिनांक 3/6/21 रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सेविका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, त्याबद्दल गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आणि पंचायत समिती सदस्य विकास कदम यांनी रेखा डोंगरे यांचे अभिनंदन केले,यावेळी रेखा डोंगरे कल्पना उबाळे यांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,पोलीस पाटील वर्षाताई लोणकर,सरपंच लक्ष्मीताई होले,उपसरपंच सूरज भुजबळ,सदस्या वैशालीताई शिंदे,सीमाताई बोरावके,निताताई गिरमे,स्वातीताई पवार,रोहिणीताई शिंदे,सदस्य प्रविण होले,जयसिंग दरेकर,शरद होले,ग्रामसेवक गोळे यांचे आभार मानले,एकात्मिक बालविकास प्रकल्प दौंड चे प्रकल्प अधिकारी धुमाळ सर आणिपर्यवेक्षिका शोभाताई गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे यावेळी रेखा डोंगरे यांनी सांगितले, रेखा डोंगरे यांना आदर्श सेविका पुरस्कार आणि त्याचे चोरमले वस्ती शाळेला  ISO दर्जा  मिळाला त्याबद्दल सौ रेखा तात्याबा डोंगरे आणि श्रीमती कल्पना शाम उबाळे यांचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News