शेतकऱ्यांसाठी खुशखबर उपबाजार समिती केडगाव येथे कांदा, डाळींब सेलहॉलचे रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन


शेतकऱ्यांसाठी खुशखबर उपबाजार समिती केडगाव येथे कांदा, डाळींब सेलहॉलचे रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन

विठ्ठल होले विशेष  प्रतिनिधी : दौंड तालुक्यासह आजूबाजूच्या इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे,दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड यांच्यावतीने उपबाजार समिती केडगाव येथे गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी कांदा आणि डाळींब सेलहॉलचे उद्घाटन दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे हस्ते करण्यात आले, कांदा लिलाव जवळपास जिल्ह्यात नसल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील,तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना कोल्हापूर, सोलापूर, मुंबई वाशी या ठिकाणी कांदा घेऊन जावे लागत होते,  शेतकऱ्यांची हीच समस्या ओळखून माजी आमदार रमेश थोरात यांनी कांदा आणि डाळिंब सेलहॉल स्थापन केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे,शेतकऱ्यांनी आता आपला कांदा,डाळींब विक्रीसाठी केडगाव येथे आणण्याचे आवाहन रमेश थोरात यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे, या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या राणीताई शेळके,सारिकाताई पानसरे,हेमलताताई फडके,पोपटभाई ताकवणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान आटोळे,उपसभापती राजू जगताप, संचालक रामचंद्र चौधरी, महादेव यादव,माणिक राऊत,भास्कर देवकर,विशाल शेलार,सागर फडके,सागर शितोळे, शिवाजी वाघोले, सुभाष नागवे,सीमाताई जाधव,उज्वला ताई शेळके,संपतराव निंबाळकर,उत्तमराव ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल,मापाडी व कर्मचारी उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती संचालक संभाजी ताकवणे यांनी केले, कांदा लिलाव सुरू केल्यापासून शेतकरी वर्गास झालेला फायदा तसेच समिती उत्पन्नात झालेली वाढ याची माहिती याप्रसंगी देण्यात आली,समितीचे संचालक दिलीप हंडाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News