दौंड तालुक्यातील भीमानदी काठच्या लोकांना पो. नि. नारायण पवार यांचा सावधान राहण्याचा विनंती वजा इशारा, प्रवास टाळण्याचे आवाहन


दौंड तालुक्यातील भीमानदी काठच्या लोकांना पो. नि. नारायण पवार यांचा सावधान राहण्याचा विनंती वजा इशारा, प्रवास टाळण्याचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दोन तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे  नदी ओढे दुथडी भरून वाहत आहेत,त्यादृष्टीने दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या गावांना सावधान राहण्याचा विनंती वजा इशारा दिला आहे, त्यांनी पुढे म्हटले सर्वांना कळकळीची विनंती सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत असून,काही ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टी सुरू असून सर्व नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत, अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेले आहेत, ठिकठिकाणी घाटात दरडी कोसळल्या असून वाहतूकही बंद आहे, विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, काही ठिकानी तर दुर्दैवी घटना घडल्या असून अनेक जण पाण्यात वाहून गेले आहेत, नदी नाले ओढ्या काठी राहणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, वीज कडकडत असताना झाडाखाली थांबू नये,मोडकळीस आलेल्या घरामध्ये थांबू नये गावातील मंदिर, शाळा,ग्रापंचायत कार्यालय,समाज मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,आणि  जोपर्यंत पावसाचा जोर कमी होऊन पाण्याचा धोका कमी होत नाही तोपर्यंत आपण व आपले कुटुंब कुठेही बाहेर जाऊ नका,विनाकारण प्रवास तर बिलकुल करू नका,पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात कोणतेही वाहन घालू नये अति घाई करू नये स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या,असे आवाहन यावेळी नारायण पवार यांनी जनतेला केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News