शहर कचरा कुंडी मुक्त आणि कचरा डेपो मुक्त होणार.....ॲड. नितीन लांडगे


शहर कचरा कुंडी मुक्त आणि कचरा डेपो मुक्त होणार.....ॲड. नितीन लांडगे

घनकचरा व्यवस्थापनासाठी चार प्रभागांची निवड.....ॲड. नितीन लांडगे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पिंपरी (दि. 22 जुलै 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत संकलीत होणा-या कच-याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ‘प्रायोगिक तत्वावर घनकचरा व्यवस्थापन’ कामासाठी शहरातील चार प्रभागांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव आज गुरुवारी (दि. 22 जुलै) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

      पक्षनेते आणि स्थायी समितीच्या काही सदस्यांनी व अधिका-यांनी मागील पंधरवड्यात इंदोरचा दौरा केला होता. इंदोर शहरातील कचरा व्यवस्थापन मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स हि संस्था करते. त्याच संस्थेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार निवड झालेल्या प्रभागातील प्रत्येक संस्था, घरांसाठी 19 रुपये (रुपये एकोणीस प्रत्येकी) दरानुसार कचरा संकलन केले जाईल. यामध्ये प्रभाग क्रमांक 7, 15, 28 आणि 29 ची निवड करण्यात आली आहे. या चारही प्रभागात अंदाजीत कुटूब संख्या आणि व्यावसायिक आस्थापनांची संख्या 98545 इतकी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तीन महिन्यांचा खर्च रुपये 56,17,065=00 (रुपये छप्पन्न लाख सतरा हजार पासष्ट फक्त) इतका अपेक्षित आहे. या संस्थेने नियुक्त केलेले कर्मचारी या चारही प्रभागात घरोघरी जाऊन कचरा विलगीकरणाचे महत्व नागरीकांना पटवून देतील. तसेच कचरा संकलीत करताना ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक असे वर्गीकरण करण्यात येईल. यासाठी नागरीकांचे प्रबोधन करण्यात येईल. आगामी तीन महिन्यात शहरातील सर्व प्रभागातून विलगीकरण केलेला कचरा संकलीत करण्यासाठी प्रशासन टेंडर प्रक्रिया पुर्ण करेल. यानंतर संपुर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम सुरु होईल. हि सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर कचरा कुंडी मुक्त आणि कचरा डेपो मुक्त होईल अशीही माहिती सभापती लांडगे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News