सरकारी नोकरशाही, मंत्री व लोकप्रतिनिधींना कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी क्रांती दिनी स्वकार्य भग्याभा चे आग्रह धरुन सत्यबोधी सुर्यनामा


सरकारी नोकरशाही, मंत्री व लोकप्रतिनिधींना कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी क्रांती दिनी स्वकार्य भग्याभा चे आग्रह धरुन सत्यबोधी सुर्यनामा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- देशातील सरकारी नोकरशाही, मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्यात कर्तव्य बाबतची अनास्था असल्याने  त्यांच्यात कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी पिपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मंगळवार दि. 9 ऑगस्ट क्रांती दिनी शहरातील हुतात्मा स्मारकात स्वकार्य भग्याभा चे आग्रह धरुन सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली. परंतु स्वराज्याची फळे सर्वसामान्य माणसाला मिळालेली नाहीत. सत्ताधारी लोकांनी स्वत:चे विहित कर्तव्य सोडून आपले घर कसे भरले आणि प्रतिष्ठा कशी मिळेल? यासाठी सातत्याने प्रयत्न चालवलेला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व सत्ताधारी, लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरशाही स्व कार्यापासून लांब आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था प्रगत होऊ शकली नाही. देशात गरिबी, दारिद्र्य, जातीव्यवस्था हे प्रश्‍न आजही तशाच आहेत. प्रत्येक शहरामध्ये झोपडपट्ट्या विस्तारित होत आहेत.सत्ताधारी उन्नतचेतनेपासून लांब असल्याने व आपल्या कर्तव्याबाबत टंगळमंगळ करीत असल्याने देशाची प्रगती खुंटली आहे. 

स्वकार्य भग्यभा म्हणजे स्वतःच्या विविध कर्तव्य बाबतची भक्ति, ज्ञान आणि सातत्याने भान या गोष्टी देशाच्या पंतप्रधानांपासून सरपंच पर्यंत सर्वांनी स्वीकारून अंमलबजावणी केली पाहिजे. सोळा महिन्यांच्या कोरोना महामारीच्या काळात न्यायालय काम करत नाहीत, सरकारी नोकर टंगळमंगळ करते, मंत्री-संत्री आणि लोकप्रतिनिधी आपलं कर्तव्य बाबत उदासीन आहेत. स्वराज्याचा बट्ट्याबोळ होण्याचे कारण म्हणजे व कर्तव्याबाबतची अनास्था सर्वत्र आढळून येते. याच कारणासाठी स्वकार्य भग्याभा कार्यक्रमाचा सत्यबोधी सुर्यनामा क्रांतिदिनी करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या स्वकार्य भग्याभाच्या आग्रहासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News