भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव  गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम


गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचा उपक्रम कौतुकास्पद -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोकडेश्‍वर मंदिर येथे हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. 

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, नितीन लिगडे, सुभाष होडगे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, विशाल बेलपवार, संभाजी भिंगारदिवे, दिपक बडदे, नाथाजी राऊत, रोहिदास नामदे, कैलास मोहिते, सौ. भावे, मुसा सय्यद, जालिंदर बोरुडे, स्वप्नील खरात, बाळासाहेब राठोड, वैभव ढाकणे, सिध्दार्थ अढाव, अंकुश मोहिते, ईश्‍वर गवळी, संपत ओहोळ, आप्पा धाडगे, दिपक लिपाणे, मतिन ठाकरे, मच्छिंद्र बेरड आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान  न करता शैक्षणिक मुल्यमापन करुन त्यांना गुण देण्यात आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.  

प्रास्ताविकात संजय सपकाळ यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे वाढदिवस भिंगारमध्ये सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्यात येतात. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे महाराष्ट्राला योग्य दिशा देत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी घेतलेले निर्णय दिशादर्शक ठरले. राजकारणातील धोरणी  व परखड नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांचे कार्य सुरु असून, आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने ना. अजित पवार यांनी भिंगारचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.माणिक विधाते यांनी ना. अजित पवार यांच्या रुपाने दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभला, हा महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया असून, या ध्येयाने त्यांचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News