भारतातील पहिले इटर्निया ॲल्युमिनीयम विंडो सिस्टीम शोरूम पुणे येथे सुरू


भारतातील पहिले इटर्निया ॲल्युमिनीयम विंडो सिस्टीम शोरूम पुणे येथे सुरू

प्रथमच लॅब टेस्टेड विंडो सिस्टिम बाजारात

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

पुणे : ॲल्युमिनीयम विंडोजसाठी प्रसिद्ध असलेल्या इटर्निया – ॲल्युमिनीयम विंडो सिस्टीम बाय हिंदालको (आदित्य बिर्ला ग्रुप)चे भारतालील पहिले शोरूम पुण्यात सुरू झाले आहे. . या शोरूमचे उद्घाटन इटर्नियाचे प्रेसिडेंट आणि सीईओ श्री चंदन आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इटर्नियाचे जनरल मॅनेजर पीयूष श्रीवास्तव, ॲल्युविंडचे एम.डी एम. एम. काबरा, ॲल्युविंडचे संचालक जगमोहन काबरा , राजेश  काबरा  आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना ॲल्युविंडचे एम.डी एम. एम. काबरा म्हणाले, इटर्निया – अॅल्युमिनीयम विंडो सिस्टीम बाय हिंदालको (आदित्य बिर्ला ग्रुप) चे भारतालील पहिले शोरूम पुण्यात सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या 35 वर्षांपासून आम्ही अॅल्युमिनीयम विंडोज आणि डोअर तयार करण्याच्या क्षेत्रात कार्यरत असून आमची कंपनी भीमा कोरेगाव येथे आहे. आमचे सगळे प्रॉडक्ट मेक इन इंडिया आहेत. या शोरूमच्या माध्यमातून आम्ही भारतात प्रथमच लॅब टेस्टेड विंडो सिस्टिम ही बाजारात आणली आहे. ज्यामुळे सभोवतालच्या ऊन, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम या विंडोजवर होणार नाही. या उत्पादनात डुरेनियम  अॅल्युमिनीयम अलाय वापरण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना थेट कंपनी कडून गॅरंटी, वॉरंटी मिळते. इटर्निया सोबत आम्ही एक नवीन सुरूवात करीत आहोत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News