धक्कादायक!! दहावी पास विद्यार्थ्यांची फी अभावी दाखल्या साठी अडवणूक... मनसे कडे धाव


धक्कादायक!! दहावी पास विद्यार्थ्यांची फी अभावी दाखल्या साठी अडवणूक... मनसे कडे धाव

दाखला मिळाला नाही तर अकरावी प्रवेश कसा घ्यायचा मनसेच्या नितीन भुतारे यांचा सवाल

केडगाव कारमेल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील प्रकार

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) शहरातील केडगाव भागातील कारमेल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातुन दहावी पास विद्यार्थ्याना फी साठी तगादा चालू केला असुन आपण फी पुर्ण फी भरली नाही तर शाळा सोडल्याचा दाखला तसेच दहावी पास मार्कशिट देणार नाही अश्या प्रकारच्या धमक्या शाळा व्यवस्थापन देत असल्यामुळे संबधीत विद्यार्थ्यांनी मनसेचे नितीन भुतारे यांच्याकडे धाव घेतली व संबधीत प्रकार सांगितल्या नंतर नितीन भुतारे v सर्व विध्यार्थी यांनी महानगरपालिका शिक्षण अधिकारी पवार साहेब यांची भेट घेउन निवेदन दिले तसेच या निवेदनात त त्यांनी म्हटले आहे की या विद्यार्थ्यांनी शाळेची अर्धी फी भरलेली असुन शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या आदेशानूसार लॉकडाऊन काळात फक्त ऑनलाइन शिक्षना मुळे फक्त शिकवणी फी टुयशन फी घेण्याचे आदेश दिल्यामुळे नियमानुसार अर्धी फी विद्यार्थ्यांनी जमा केल्यामुळे दहावी पास विद्यार्थ्यांची दाखला व मार्कशिट साठी अडवणुक करणे योग्य नसून संबधीत विद्या र्थ्याना अकरावी प्रवेश करिता अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती देखील केली आहे. तसेच दोन दिवसात प्रश्न मार्गी लावा अन्यथा मनसे शाळेबाहेर तसेच शिक्षण विभाग महानगरपालिका व शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषदे बाहेर आंदोलनं करण्यात येईल असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे. यावेळी कारमेल शाळेचे विद्यार्थी मयुर सुर्यवंशी, गौरव गवई, संदेश निमगावकर, विशाल हिरवणे, हर्षल भंडारी, मल्हार शिंदे,ओंकार घुले वैभव काळे, ओम खंडागळे, प्रतीक भोसले आदी. उपस्थीत होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News