मागील वर्षाचा शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप व रब्बी पिक विम्याची मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना काय शेतकरी मेल्यावर देणार का ? ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे


मागील वर्षाचा शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप व रब्बी पिक विम्याची मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना काय शेतकरी मेल्यावर देणार का ?  ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे

मागील वर्षाचा शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप व रब्बी पिक विम्याची मंजूर झालेली रक्कम शेतकऱ्यांना काय शेतकरी मेल्यावर देणार का ? असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांनी शेवगाव येथे केले. 

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

 २०२०-२१ या वर्षामधील खरीप व रब्बी हंगामामधील मंजूर झालेला पिक विमा शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन अॅड.शिवाजीराव काकडे व सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जनशक्तीच्या वतीने नायब तहसीलदार मयूर बेरड यांना शेवगाव येथे देण्यात आले. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, कॉ. राम पोटफोडे, सुरेश चौधरी, किशोर दहिफळे, नवनाथ खेडकर, गोरक्ष चेमटे, शिवाजी लांडे, अजिनाथ कातकडे,  विष्णू दिवटे, देवदान अल्हाट, म्हतारदेव आव्हाड, राजेंद्र खेडकर, अनिल नागरगोजे, दिनकर ढाकणे, निष्णू निजवे, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, सुरेश टेकाळे, भाऊसाहेब मासाळ, हरिश्‍चंद्र आव्हाड, भारत भालेराव, भिवसेन केदार, रघुनाथ घोरपडे, हरिचंद्र निजवे,  आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, सन २०२०-२१ या वर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील पिकविमा भरला होता. मागील वर्षी अतिरिक्त पावसामुळे दोन्ही हंगामातील पिके वाया गेली होती. यामध्ये कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा आदि हंगामातील पिकांचा समावेश आहे. सदरची सर्व पिके अतिरिक्त पावसामुळे व वेळेला ताण मिळाल्यामुळे नष्ट झाली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरामधे पेरणीचा खर्च देखील पडला नाही. लाखोंचा खर्च करूनही शेतकऱ्यांना काहीच न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीमध्ये पिकविमा मंजूर करण्यासाठी शासनाने पावलेही उचलली आहेत. आपल्या लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभही मिळालेला आहे. त्या त्या परिसरातील जागृत लोकप्रतिनिधीमुळे त्यांच्या पदरात ती रक्कम जमा झाली आहे. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न कोणीही न मांडल्याने तो पोरका झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पिक विमा मिळेल या आशेवर शेतकरी आजही वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्वतः लक्ष घालून ही पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तातडीने उचित पावले टाकावीत व दहा दिवसाच्या आत कार्यवाही करून सदरच्या पिकविमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा करावी. अन्यथा दहा दिवसानंतर शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या मागणीच्या पूर्ततेसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अमरापूर ते पाथर्डी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पाथर्डी यांच्या कार्यालयावर पायी दिंडी काढून आपला संताप व्यक्त करतील. असेही निवेदनात म्हंटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News