दौंड शहरात कुरकुंभ मोरीजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह,पो नि नारायण पवार यांचे ओळख पटविण्यासाठी दौंडकराना आवाहन


दौंड शहरात कुरकुंभ मोरीजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह,पो नि नारायण पवार यांचे ओळख पटविण्यासाठी दौंडकराना आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :


दौंड शहरातील कुरकुंभ मोरीजवळ साचलेल्या पाण्यात एका 38 ते 40 वर्षीय पुरुषाचा मुरतदेह आढळला असल्याची माहिती पो हवा ज्ञानेश्वर राऊत यांनी दिली आहे, सदर व्यक्ती कुरकुंभ मोरी येथील साचलेल्या पाण्यात पालथ्या अवस्थेत पडलेला होता त्याच्या अंगात बदामी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट त्याच्या गुलाबी रंगाचे बटन(गुंड्या) लावलेल्या आहेत,निळ्या रंगांची नाईट पॅन्ट घातलेली आहे,त्याचे वरच्या बाजूचे  पुढील दोन दात पडलेले आहेत,दाढी मिशा वाढलेल्या आहेत तर डोक्याचे बारीक आणि काळे आहेत,त्याच्या उजव्या दंडावर बजरंग बली असे गोंदलेले आहे,या वर्णनाचा व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असल्यास दौंड पोलीस स्टेशन 02117 262333 या नंबरवर फोन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे यावेळी सांगितले आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा विकास गावडे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News