पिक विम्याची मुदत वाढ मिळुनही " या शेतकऱ्यांचा फायदा नाही


पिक विम्याची मुदत वाढ मिळुनही " या शेतकऱ्यांचा फायदा नाही

राजेंद्र तासकर कोपरगाव प्रतिनिधी :

     कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील शेतकऱ्यांना खरिप पिक विम्याची मुदत वाढ मिळुन ही फायदा होत नसल्याने  धोबी का कुत्ता ना घाट का ना घर का  अशी गत तयार झाली आहे . त्यामुळे त्यांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे .

           वर्षापूर्वी कुंभारी येथील कामगार तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात लाच घेतांना रंगेहात सापडल्याने त्यांस निलंबित करण्यात आले .परंतु , त्यांच्या जागेवर नविन कामगार तलाठी रुजु होण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांमध्ये दबक्या  आवाजात बोलले जात आहे . जर असे असेल तर येथील शेतकऱ्यांना वाली कोण?

         भाजपाचे प्रदेश अध्यक्षा सौ. स्नेहलता बिपिनदादा  कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्न म्हणुन, शासनाकडून खरिप पिक विमा भरण्यासाठी 23 जुलै पर्यंत मुदत वाढ मिळविली आहे जेणे करून सर्व शेतकऱ्यांना खरिप पिकविमा भरता यावा व कोणी वंचित राहु नये .

         शासन स्तरावर शेतकरी हिताच्या विविध प्रकारच्या योजना राबविल्या  जातात परंतु त्या योजनेची अमलबजावनी करणारेच जर जागेवर ( सजेवर ) रुजु नसतील तर येथील शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे?

     इतक्या मोठया लोकसंखेच्या गावात स्पेशल कामगार तलाठी असणेच योग्य ठरेल, मा. तहसिलदार योगेश चंद्रे साहेब यांनी शेतकरी हिताचा प्रश्न मार्गी लावावा असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News