मोबाईल टॉवर उशाला.. पण रेंज मात्र काशीला शेवगावकरां बरोबरच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सुध्दा अडचणींचा डोंगर..याला जबाबदार कोण???


मोबाईल टॉवर उशाला.. पण रेंज मात्र काशीला शेवगावकरां बरोबरच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सुध्दा अडचणींचा डोंगर..याला जबाबदार कोण???

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव शहरासह तालुक्यातील   गावा गावात  जी ओ सह बी.एस.एन.एल. आयडिया आणि ईतर कंपन्यांचे चे टॉवर आहेत  पण रेंज मात्र एकालाही नाही. नेटवर्क शहरात आहेत आणि रेंज मात्र  दुसऱ्या गावात येत आहे.* त्यामुळे मोबाईल असुनही शेवगांव शहरात नेटवर्क येत नाही व खेडे गावात नेटवर्क येत नसल्याने शहरवासियां बरोबरच  ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक अडचणीला सामोरे जावे लागतंय. *शेवगांव शहरासह तालुक्यातील लाईट गेल्यास चालु फोन कॉल बंद पडतो विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास बंद पडतात नेटवर्क गायब होते सर्व मोबाईल कंपन्यांनी याची गंभीर दखल  घ्यावी  व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवगांव शहरातील नागरिकांतर्फे देण्यात आला आहे*  शेवगांव शहरात  बी.एस.एन.एल. सह सुमारे लहान मोठे शंभर टॉवर आहेत पण  टॉवरच नेटवर्क फक्त लाईट वर आधारित आहे . *वीज गेली की नेटवर्क जाते चालु कॉल ड्रॉप होतो . तसेच पाऊस झाला तर दोन किंवा तीन तास  बंद पडते  त्यामुळे शहरातील  काही बऱ्या- वाईट घटनांची माहिती सोशल मिडीयामधून नेटवर्क नसल्याने शेवगावकरांना माहित   होत नाही.* बँका पतसंस्था खासगी आस्थापने यांचे व्यवहार ठप्प होतात नेटवर्क त्वरित सुरळीत करावे  या मागणीकडे सर्व नामांकित *मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी व त्यांची शिखर संस्था ट्राय  लक्ष  घालणे गरजेचे आहे* त्यामुळे  नेटवर्कचा तिढा सुटेल. त्यामुळे या मागणीची टॉवर कंपन्यांनी  दखल घेऊन टॉवर लवकरात लवकर दुरुस्त करावे करावं . अशी मागणी शेवगावकरांनी केली आहे .   

ऑनलाइन शिक्षण आता सरकारने शिक्षकांना ऑनलाइन क्लास घेण्यास सांगितलं नेटवर्क अभावी विद्यार्थी शिक्षण घेतील कसे ? असा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने या बाबत दखल घ्यावी, व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मी शेवगांवकर संघटने तर्फे  देण्यात आला आहे.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News