इनर्व्हिलच्या सदस्यांनी घेतले अनाथ विद्यार्थ्यांतील श्रीविठ्ठलाचे दर्शन


इनर्व्हिलच्या सदस्यांनी घेतले अनाथ विद्यार्थ्यांतील श्रीविठ्ठलाचे दर्शन

शेवगाव :  आषाढी एकादशीचे औचित्य साधून शेवगाव इनर्व्हिल क्लब तर्फे उचल फाऊंडेशनच्या वसतिगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, धान्य व एक महिन्याचा किराणा देण्यात आला.

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंगळवारी ( दि. २० ) शेवगाव इनर्व्हिल क्लबने स्नेहालय प्रेरित शहरातील उचल फाऊंडेशनच्या वसतिगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, धान्य व एक महिन्याचा किराणा देत मदतीचा हात दिला. या अनाथ विद्यार्थ्यांत श्रीविठ्ठलाचे दर्शन झाल्याची भावना इनर्व्हिलच्या सदस्यांनी व्यक्त केली.

या वेळी शेवगाव इनर्व्हील क्लबतर्फे उचल फाऊंडेशनच्या अनाथ विद्यार्थ्यांच्या वसतीगृहास देण्यात आलेल्या कार्यालयीन कपाट व दोन शौचालयांचे अनावरण इनर्व्हिलच्या अध्यक्षा  डॉ. मनिषा लड्डा, वसुधा सावरकर, स्नेहल लाड यांच्या हस्ते झाले.

या वेळी डॉ. मनिषा लड्डा म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्नेहालय प्रेरित येथील उचल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कामात मर्यादा येत आहे.  इनर्व्हील क्लबने सातत्याने मदतीचा हात दिल्याने येथील अनेक कामे मार्गी लागण्यास मदत होत आहे.

यावेळी  इनर्व्हील परिवारातील सदस्या स्वाती डहाळे व  सूनंदा डहाळे यांनी मुलांसाठी फराळ, धान्य आदी साहित्य दिले. स्नेहल लाड यांनी खाऊ वाटप केले.  कीर्ती कलेक्शनचे सुरेश जाजू यांनीही त्यांच्या मतोश्रींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व मुलांसाठी नवीन कपडे, किराणा, धान्य इत्यादी साहित्य दिले. व्यावसायिक रितेश रामप्रसाद जाजू यांनी दोन टॉयलेटच्या फरशी व कमोडसाठी मदत केली.  या वेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व लेखिका कै. वासंती भोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन  राजश्री रसाळ यांनी केले. तर  पूजा धूत यांनी आभार मानले.

-------------  


२) शेवगाव : शेवगाव :  आषाढी एकादशीचे औचित्य साधून शेवगाव इनर्व्हिल क्लब तर्फे उचल फाऊंडेशनच्या वसतिगृहात बांधण्यात आलेल्या दोन शौचालयांचे अनावरण करण्यात आले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News