पी. आय. ज्योती गडकरी या आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील


पी. आय. ज्योती गडकरी या आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील

- तोफखाना पोलिस स्टेशनच्या नूतन पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांचा साई संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करतांना अध्यक्ष तथा नगरसेवक सुनिल त्र्यंबके. समवेत पो.उपनिरिक्षक समाधान सोळंके, पो. उपनिरिक्षक सुरज मेढे, सहा पोलिस निरिक्षक किरण सुरसे, सहा पोलिस निरिक्षक रविंद्र पिंगळे, सहा पोलिस निरिक्षक दिनकर मुंडे, योगेश पिंपळे आदि.(छाया : विजय मते)

साई-संषर्घ सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

     अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) आज समाजात पुरुषांएवढेच महिलांनाही मानाचे स्थान आहे. सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कामाने  आदर्श निर्माण केला आहे. मग ते सामाजिक, राजकीय किंवा प्रशासकीय, पोलिस दल असो. नगरला नव्याने आलेल्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी देखील यापूर्वी पोलिस दलाला अभिमान वाटेल असे काम केले आहे.  नगरला देखील त्या आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील. नगरमध्येही त्या चांगले काम करुन नागरिकांना दिलासा देण्याचे काम करतील, असे प्रतिपादन साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक म्हणून नव्याने रुजू झालेल्या ज्योती गडकरी यांचा सत्कार श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंके, पोलिस उपनिरिक्षक सुरज मेढे, सहा पोलिस निरिक्षक किरण सुरसे, सहा पोलिस निरिक्षक रविंद्र पिंगळे, सहा पोलिस निरिक्षक दिनकर मुंडे, प्रतिष्ठानचे सचिव योगेश पिंपळे उपस्थित होते.     श्री.त्र्यंबके पुढे म्हणाले, नगर शहरातील उपनगरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांनी आता ठोस व खंबीर भुमिका घ्यावी. प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पोलिस दलाच्या सहकार्याने उपक्रम राबवू, असे सांगितले.


     सत्काराला उत्तर देताना ज्योती गडकरी म्हणाल्या, महिलांच्या रक्षणाबरोबरच छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची गय केली जाणार नाही. कारवाई करतांना नि:पक्षपातीपणे करणार आहोत. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उपक्रम हाती घेऊ असे सांगितले. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News