मनुष्याच्या मेंदूतील सर्व रहस्य उलगडणार्‍या ब्रेन - बेस इंटेलिजियन्स टेस्ट चा भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध


मनुष्याच्या मेंदूतील सर्व रहस्य उलगडणार्‍या  ब्रेन - बेस इंटेलिजियन्स टेस्ट चा भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध

पुणे प्रतिनिधी सागरराज बोदगिरे

पुणे  :   मनुष्याच्या मेंदूतील सर्व रहस्य उलगडणार्‍या बीबीआयटी / ब्रेन - बेस इंटेलिजियन्स टेस्ट चा भारतीयांनी शास्त्रज्ञांनी शोध लावला असून   मानसशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ प्रसाद दास यांनी विकसीत केलेल्या ह्या   ब्रेन - बेस इंटेलिजियन्स टेस्टचे लोकार्पण नुकतेच ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आले.

ब्रेन बेस्ड इंटेलिजेंस टेस्ट (बीबीआयटी) कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठाचे प्राध्यापक जेपी दास आणि देशातील शीर्ष मानसशास्त्रज्ञ आणि क्लिनिकल मनोचिकित्सकांच्या टीमने तयार केली आहे. तीन वर्षांच्या संशोधन आणि परिश्रमानंतर ही चाचणी करण्यात यश मिळाले आहे. बीबीआयटी नावाची ही चाचणी देशात लॉच करण्यात आली आहे. 

 या बीबीआयटी लॉंच कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. कालिदास डी. चव्हाण हे होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत, शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि अन्य प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

बुद्धीमत्तेची संकल्पना आणि मापन यावरील दास यांनी केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. डॉ. जे. पी. दास यांच्या मार्गदर्शनाखालील अभिजन पथकाने ही बीबीआयटी ‘आयक्यू’ टेस्ट विकसीत केेली असून तिच्याकडे संज्ञानात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाते.

ही अनोखी ‘आयक्यू’ चाचणी मोठी लोकसंख्या असणार्‍या भारतीयांसाठी विकसीत करण्यात आली आहे.  शैक्षणिक क्षेत्रात संज्ञानात्मक प्रक्रियेचा हा पाया समजला जातो - विशेषत: वाचन आणि गणित या विषयासाठी.  ही चाचणी स्ट्रोक, अपस्मार आणि मेंदूला लागलेला मार किंवा जखम झाल्यानंतर त्यांचे निदान करण्यास मदत करते. हायपर ऍक्टिव्हिटी आणि मुलांना शिक्षण घेताना येणारी अडचण यावरही निदान करते.

डॉ. जगन्नाथ प्रसाद दास हे भुवनेश्वर येथील असून मानसशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी बुद्धीमत्ता आणि द दास - नाग्लीरेरी कॉग्निटिव्ह ऍसेसमेंट सिस्टीम हा सिद्धांत मांडण्यासह बुद्धीमत्ता आणि बालपणातील मनोविकासाच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

डॉ. जे.पी. दास हे सध्या एमेरेटस संचालक म्हणून सेंटर ऑन डेव्हलपमेंट ऍण्ड लर्निंग डिसऍबिलिटीज आणि एज्युकेशनल सायकॉलॉजी या विषयाचे एमेरेटस प्रोफेसर म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ अलबर्टा, कॅनडा येथे कार्यरत आहेत. तसेच ते रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे सदस्य असून  2015 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. हा कॅनडातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News