गुंड गण्या रासकर गोळीबार खुन प्रकरणातील एक आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची दबंग कारवाई


गुंड गण्या रासकर गोळीबार खुन प्रकरणातील एक आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :निरा येथील गुंड गण्या रासकर याचेवरील गोळीबार खुन प्रकरणातील एका आरोपीस सातारा जिल्ह्यातून जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     निरा ता.पुरंदर जि.पुणे येथील रेल्वे स्टेशन समोरील गणेश फ्लॉवर मर्चंट जवळ दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास गुंड गणेश रासकर यास त्याचे ओळखीचे आरोपी यांनी कोर्ट कामकाजासाठी पैसे दिले नाहीत व इतर भांडणाचे कारणावरून गुंड गणेश विठ्ठल रासकर रा.निरा ता.पुरंधर जि.पुणे याचेवर रिव्हॉल्वरने गोळीबार करून त्याचा खून केलेबाबत जेजूरी पोलीस स्टेशनला खुनासह आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हयामध्ये आरोपी नामे १.निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे रा.पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा  २.गौरव जगन्नाथ लकडे रा.मिरेवाडी ता.खंडाळा जि.सातारा व इतर साथीदार यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले होते. गुंड गणेश रासकर याच्यावर यापूर्वी खून जबरी चोरी मारामारी तसेच मोक्का अंतर्गत एकूण १७ गुन्हे दाखल होते. जून महिन्यातच तो येरवडा जेल येथून जामिनावर सुटलेला होता. 

     सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सुद्धा दोन पथके नेमण्यात आलेली होती. यापूर्वी गुन्हयात आरोपी नामे निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे यास जेजुरी पोलीस स्टेशन कडून अटक करण्यात आलेली आहे. 

     गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी नामे संकेत उर्फ गोटया सुरेश कदम वय २५ वर्षे रा.लोणी ता.खंडाळा जि.सातारा हा सुद्धा सामील असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्याचा राहते घरी व परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. गुन्हा घडल्यापासून तो पोलीस पकडतील या भितीने गावी न राहता फरार झालेला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून त्यास शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा येथून जेरबंद केलेले आहे. सदर खुनाच्या गुन्हयात सामील असल्याची त्याने कबुली दिलेली असून त्यास पुढील तपास कामी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आणखीन कोण सामील आहे काय? याबाबतचा पुढील अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत.

     सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, अक्षय जावळे यांचे पथकाने केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News