मुरूमातही माती खाणारा खंडणी बहाद्दर सामाजिक कार्यकर्त्यावर दौंड पोलिसात गुन्हा दाखल


मुरूमातही माती खाणारा खंडणी बहाद्दर सामाजिक कार्यकर्त्यावर दौंड पोलिसात गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : मुरूम वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक व मालक यांना वारंवार धमकी देऊन 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणी बहाद्दर सामाजिक दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अंकुश रामचंद्र वणवे वय 38 राहणार अंबिकानगर पाटस यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की मी मुरूम वाहतुक व्यवसाय करत आहे, माझ्या मालकीचा  टिप्पर नंबर MH 42 AQ 7932 मधून रीतसर परवाना घेऊन वाहतूक करीत आहे परंतू पाटस येथील राजेश पांडुरंग लाड यांनी 20 दिवसापूर्वी वायरलेस फाटा गिरीम तालुका दौंड याठिकाणी मला रस्त्यावर मुरूम टाकत असताना त्याठिकाणी येऊन मला पैशाची मागणी केली, त्यानंतर 20/7/21 रोजी  सायंकाळी 6:40 सुमारास हेमंत जाधव यांच्या घरासमोर उशीर झाल्यामुळे चालक संतोष भुजबळ हे घेऊन जात असताना राजेश लाड याने गाडीचा पाठलाग करून तेथे आल्यानंतर चालकाला दमदाटी करून मुरूम खाली करण्यास भाग पाडले,चालक भुजबळ यांनी मला फोन करून बोलावून घेतले त्यावेळी त्याने मला 1 लाख रुपये दे नाहीतर तुम्ही कसा मुरूम वाहता तेच बघतो एकेकाला मातीतच घडतो अशी धमकी दिली असल्याची बद्दल तक्रार दाखल केली आहे त्यानुसार गु रजिस्टर नंबर 396/2021 भा द वि कलम 384,385,387 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे, अशी माहिती पो हवा राऊत यांनी दिली आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News