स्कॉर्पिओसह २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त तीनजण ताब्यात: पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी


स्कॉर्पिओसह २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त तीनजण ताब्यात: पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२० जुलै २०२१ रोजी गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीवरून भिगवण व वालचंदनगर येथे मिळून आलेले तिघे संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा एकूण किंमत ७,५०,३००/- (सात लाख पन्नास हजार तीनशे) रुपयाचा माल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदर्शनाखाली विभागानुसार गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

     स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केलेल्या पहिल्या कारवाईत भिगवण गावचे हद्दीत पुणे-सोलापूर रोड लगत, एस.टी.स्टॅड समोरील उड्डानपुलाचे खाली, ता.इंदापूर जि.पुणे येथे  इसम नामे नामे गणेश गजानन यादव वय २६ वर्षे रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे याचे स्कार्पिओ वाहनात लपवून ठेवलेले १ गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस असा  स्कार्पिओ जीपसह एकुण  किंमत रुपये ७,००,१००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

     दुसऱ्या कारवाईत वालचंदनगर जंक्शन चौक, कळस रोड ता.इंदापूर जि.पुणे येथे इसम नामे १)सचिन बाळू दळवी वय २९ वर्षे रा.वालचंदनगर, रामवाडी ता.इंदापूर जि.पुणे २)सुनिल सुदर्शन खरात वय ३० वर्षे रा.रणगाव , खरातवस्ती ता.इंदापूर जि.पुणे यांचे ताब्यातून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस असा एकुण किंमत रु.५०,२००/-  चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

    आरोपी सचिन दळवी व सुनील खरात हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी सचिन दळवी याच्यावर सन २०१९ मध्ये ॲट्रॉसिटी व सन २०२० मध्ये गुटखा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सुनील खरात याच्यावर सन २०१३ मध्ये मारामारी व सन २०१९ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.  

     सदर कारवाईत १)गणेश गजानन यादव वय २६ वर्षे रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे २)सचिन बाळू दळवी वय २९ वर्षे रा.वालचंदनगर, ता.इंदापूर जि.पुणे ३)सुनिल सुदर्शन खरात वय ३० वर्षे रा.रणगाव, ता.इंदापूर जि.पुणे या तिघांना अटक करण्यात आलेली असून आरोपींविरुद्ध भिगवण व वालचंदनगर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. 

    आरोपींनी सदरचे गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी आणले? त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का? त्याचा कोठे वापर केला आहे का? याबाबतचा अधिक तपास भिगवण व वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

     सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, अक्षय जावळे यांचे पथकाने केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News