चोपडज परिसरात बिबटयाचे पुन्हा दर्शन


चोपडज परिसरात बिबटयाचे पुन्हा दर्शन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)बारामती तालुक्यातील चोपडज नजीक पवारवस्ती याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचे वैभव संजय गाडेकर यांनी सांगितले. तसेच त्याने आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र टिपले आहे. त्यामुळे परिसरात शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 चोपडज-पवारवस्ती या परिसरात गेली एक महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचा दावा येथे काम करणाऱ्या व राहत असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. मागील आठवड्यात सचिन पवार यांचे बोकड या बिबट्याने फस्त केले.

     वनविभागाच्यावतीने या घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास रिपोर्ट पाठवावा व वनविभागाने बिबट्याचा शोध लवकर घ्यावा आणि बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी येथे पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी येथील ग्रामस्थ संजय गाडेकर व संदीप साळुंखे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News