कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदचे नमाज घरातच अदा करण्याचे पो नि नारायण पवार यांचे आवाहन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदचे नमाज घरातच अदा करण्याचे पो नि नारायण पवार यांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :कोरोना महामारी मुळे देशातील सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे करावेत लागत आहेत,त्याच अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे मुस्लिम बांधवांची शांतता कमिटीची मिटिंग आयोजित करण्यात आली होती,

यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या  नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, कोरोना संसर्ग अजून संपलेला नाही,आपल्या परिसरात रुग्ण संख्या वाढतच आहे, त्यामुळे सर्व बांधवांनी आपली आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले आहे, बुधवार दिनांक 21/7/21 रोजी बकरी ईद साजरी होत आहे, दौंड येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येत असतात त्या सर्वांना घरीच ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये,मिरवणूक काढू नये,गर्दी करू नये ईदगाह मैदानावर फक्त पाचच लोकांना नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे,आपणच आपल्या लोकांची काळजी घेऊन ईद घरीच राहून आनंदात साजरी करावी असे सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आवाहन केले आहे, यावेळी शाही आलमगीर मस्जिद चे विश्वस्त युसूफ इनामदार तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News