दौंड विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तरुणाने रंगोळीतून साकारली विठू माऊलीची प्रतिमा


दौंड विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तरुणाने रंगोळीतून साकारली विठू माऊलीची प्रतिमा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी,  दौंड येथील मंदिरात गावोगावी च्या पालखी च्या स्वागताला भव्य मंडप टाकून हारफुलें तसेच रांगोळ्यांनी पायघड्या घातल्या जातात परंतु कोरोनामुळे भाविक नाही,पालखी,ढोल ताशे नाहीत,विठुरायाच्या भक्तांचा आनंदच या महामारीने हिरावून घेतला आहे, मंदिर परिसरात पूजा सजावट थोड्या लोकांमध्ये केली आहे, त्या दृष्टीने दौंड येथील एका तरुणाने मंदिर गाभाऱ्यात रांगोळीच्या माध्यमातून सुबक अशी विठुरायाची प्रतिमा साकारली आहे,दौंड शहरातील स्व.आमदार सुभाष अण्णा कुल चित्रकला महाविद्यालयाचा विद्यार्थी,नृत्य शिक्षक,कला शिक्षक राजू टिपरी यांनी आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे रांगोळी चे माध्यमातून विठू माउली प्रतिमा साकारली.कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप डहाळे,नगरसेविका अॅड.अरुणा डहाळे,मंदिर ट्रस्ट पदाधिकारी यांनी टिपरी यांच्या साकारलेल्या कलाविष्काराचे कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News