दौंड प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोरोना मुळे भाविकांचा शुकशुकाट


दौंड प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोरोना मुळे भाविकांचा शुकशुकाट

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :  कोरोना महामारी मुळे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या आषाढ वारी वर दोन वर्षांपासून संकट आले आहे, आषाढ वारीला भक्त गणांचे पाऊले पंढरपूर च्या दिशेने चालू लागतात,परंतू या महामारीने देहू आळंदी येथून तुकोबा आणि माऊली यांची वाहनातून वारी घडत आहे, तीच परिस्थिती दौंड येथील पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर परिसरात झाली आहे, कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्यामुळे इथेही भाविकांची गर्दी दिसली नाही, अशी खंत विश्वस्तांनी व्यक्त केली,


दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवून काळजी घेतली आहे, यावेळी अशोक जगदाळे,रामेश्वर मंत्री,तुकाराम सावळकर, सचिन कुलथे,गटणे,कैलास जोगदंड,संतोष होले उपस्थित होते, दौंड पंचक्रोशीतील गावोगाव चे  देव ढोल ताशांच्या गजरात मंदिरात भेटीला येत असतात परंतू कोरोनामुळे फक्त नदी स्नान करून देव भेट देऊन येणाऱ्या भाविकांना नारळ पुष्पहार देऊन भक्तांना रवाना करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News