कोरोना मुळे ईद साधेपणाने साजरी करावी पोलिस निरीक्षक ढिकले


कोरोना  मुळे ईद साधेपणाने साजरी करावी पोलिस निरीक्षक ढिकले

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी):-सध्या कोरोना धोका कायम असल्याने धार्मिक उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी नसल्याने मंगळवार दिनांक २०जुलै रोजी आषाढी एकादशी व बुधवार दिनांक २१जुलै रोजी येणारी ईद-उल-अज्हा बकर ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले

बकर ईद निमित्त पोलीस ठाणे हद्दीतील मशिदीचे मौलाना,विश्वस्त यांची सामाजिक अंतर ठेवून बैठक घेण्यात आली त्यावेळी ढिकले बोलत होते

ते म्हणाले ईद निमित्ताने ईदगाह मैदान,मशिदीत सामूहिक नमाज पठण करू नये घरीच नमाज पठण करावे तसेच प्रतिकात्मक ,व घरीच कुर्बानी करावी गत वर्षी रमजान ईद,बकरी ईद तसेच २महिन्यांपूर्वी रमजान ईद येथील मुस्लिम समाजाने साधे पणाने साजरी करून कोरोना संकट काळात जबाबदारीची प्रचिती दिली यावेळी देखील राज्य सरकार,जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे पालन करून समाजात आदर्श निर्माण करावा ,ईद निमित्ताने समाजात कोरोना संक्रमन रोखण्यासाठी उपाययोजना बाबत जनजागृती करावी असे आवाहन केले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स पो नि दिलीप तेजनकर,गोपनीय शाखेचे कोपनर,मौलाना अब्दुल रहीम जकाते,शमीम कादरी,नगरसेवक निसार बेपारी,माजी नगरसेवक शब्बीर बेपारी,सह विविध मशिदीचे मौलाना,विश्वस्त उपस्थित होते

यावेळो पोलीस निरीक्षक ढिकले यांनी आषाढी एकादशीच्या तसेच बकर ईद च्या शुभेच्छा दिल्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News