उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे मोफत वाहन परवाना शिबीराचे आयोजन


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे मोफत वाहन परवाना शिबीराचे आयोजन

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी  : कर्जत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे व कर्जत शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे यांच्या वतीने मोफत दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले  होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे म्हणाले की या कोरोणाच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक समस्यांसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने व एजंट मार्फत दुचाकी व चार चाकी परवाना काढायचा असेल तर काही हजारात रक्कम मोजावी लागते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस जनतेची सेवा करून व जनतेला मदत होईल याचा विचार करूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नितीन धांडे यांनी दिली.  या कार्यक्रमास नगरसेविका मनीषा सोनमाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक बापूसाहेब नेटके, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, मनीषा सोनमाळी, डॉक्टर शबनम इनामदार, ज्येष्ठ कवियत्री स्वाती पाटील, रज्जाक झारेकरी, सचिन कुलथे, राहुल खराडे, सचिन धांडे, राहुल नवले, पृथ्वीराज चव्हाण, काकासाहेब लांगोरे, शरीफ पठाण, राहुल नेटके, प्रतीक ढेरे, योगीराज शेलार, सुशील मराळ, अजय नेवसे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाहनांचे परवाने काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या मोफत दुचाकी व चारचाकी वाहन परवाना शिबिराचे आयोजन केल्याबद्दल अनेकांनी कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे व विशाल मेहत्रे यांचे आभार मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News