जाधव कुटूंबाने आपल्या 2ऱ्या मुलाचा पण सत्यशोधक विवाहासाठी मुहूर्त ,पंचांग याला फाटा देत साधला 19 जुलै शुभदिन -रघुनाथ ढोक


जाधव कुटूंबाने आपल्या 2ऱ्या मुलाचा पण सत्यशोधक विवाहासाठी  मुहूर्त ,पंचांग याला फाटा देत साधला 19 जुलै शुभदिन -रघुनाथ ढोक

फुले एज्युकेशन तर्फे सोपान जाधव कुटुंबातील सिन्नर परिसरात 2 रा सत्यशोधक विवाह सम्पन्न

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

नाशिक- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे राहुरी फाटा ,नाशिक परिसरात पहिला सत्यशोधक विवाह सत्यशोधक नितीन सोपान जाधव ,विचुर दळवी,नाशिक आणि सत्यशोधिका निकिता अशोक मोरे ,पंचवटी,नाशिक यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पददतीने रजिस्टर नोंदणी करून 28 वा  मोफत सत्यशोधक विवाह कोव्हिडं 19 च्या नियमाला अधिन राहून सोमवार दि.19 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता विश्वविजया लॉन्स   येथे सम्पन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे,माजी नायब तहसीलदार दत्ता वायचळे, माजी पंचायत समिती सभापती सिन्नर चे प्रकाश कदम उपस्थित होते. 

 यावेळी सत्यशोधक विवाह विषयी सत्यशोधक विचाराचे कृतिशील कार्यकर्ते व आजच्या विवाहाचे आयोजक  गोविंद माळी यांनी मौलिक मार्गदर्शन करीत मार्मिक प्रबोधन केले.पुढे ते म्हणाले की मी माझे 1जुलै 21 रोजी जन्मदिनी  ब्राम्हणविरहित घरातील सर्वच कार्यक्रम माझे दशक्रिया विधी सह सत्यशोधक कार्यकर्त्यांकडून करावे असा संकल्प केला असून आपण सर्वांनी देखील करावा अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की मागील वर्षी सोपान जाधव कुटूंबाने आपल्या संग्राम व माया गोविद माळी यांचा 19 जुलै 20 रोजी मुसळगाव,सिन्नर परिसरात प्रथमच सत्यशोधक विवाह लावला .आणि आज त्यांनी दुसरा मुलगा नितीन व निकिता मोरे यांचा मुहूर्त,पंचाग,कर्मकांड याला फाटा देत 19 जुलै 21 हा शुभदिन निवडून 2 रा सत्यशोधक  विवाह लावून या परिसरात महापुरुषांचे विचाराने चालणारे कृतिशील असल्याचे दाखविले.हा आदर्श समाजाने घेऊन आर्थिक उधळपट्टी न करीता वंचितांना शैक्षणिक मदत करा ,महापुरुषांचे  पुस्तके घरातील शुभ कार्यात इतरांना भेट द्यावेत असेही  ढोक म्हणाले .

कार्यक्रमाचे सुरवातीला महापुरुषांचे फोटोला आई वडिलांचे व मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घातले तर नितीन चे हस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व  निकिता यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी वधु वर यांना माजी आमदार वाजे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र  व फुले दांपत्य फोटो प्रेम भेट दिली.तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आई वडिलांना व मोलाची मदत करणारे दीपक मंडलिक व गोविंद माळी यांना देखील वाजे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी मागील वर्षी लग्न केलेली माया जाधव-माळी हिने आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली की  बामनाकडूनच लग्न केले की चांगले होते हा लोकांनी गैरसमज ,अंधश्रद्धा दूर करा आणि पत्रिका बघून काहीही होत नाही.तर आपण मिळुन मिसळून सर्वाना धरून संसार  कसा करतो यावर कुटुंब आवलंबून असते.माझे तर सत्यशोधक पददतीने विवाह झाल्याने  प्रगती तर झालीच सोबत सावित्रीबाई फुले यांचे मुळेच मी  व आजच्या महिला शिक्षण घेत आहेत .पुढे त्या असेही म्हणाल्या की विध्येची  खरी देवता सरस्वती नसून सावित्रीबाई आहेत. 

यावेळी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड ,भारतीय संविधान उद्देशिका व मंगळाष्टके चे गायन रघुनाथ ढोक व दीपक मंडलिक यांनी केले.

 याप्रसंगी अक्षता म्हणून अन्नाची नासाडी होते म्हणून तांदुळा ऐवजी  सुगंधी फुलांचा वापर केला .या सोहळ्यास मोलाची मदत पुणे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे संस्थापक आकाश ढोक,गोविंद माळी, दीपक मंडलिक व सौ.मंगला करंजुले यांनी केले तर आभार संग्राम जाधव यांनी मानले.यावेळी सर्वांचे तोंडी जाधव कुटूंबाचे सत्यशोधक विवाहाची चर्चा लग्न मंडपात व परिसरात चांगलीच रंगली होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News