बाबुराव नगर परिसरात असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक


बाबुराव नगर परिसरात असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

शिरूर शहरातील बाबुराव नगर परिसरात असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन जुलैच्या सात तारखेला पहाटेच्या वेळी पिकअप चार चाकी वाहनांचा वापर करून दोरखंडाच्या साहाय्याने तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.या बाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

      बाबुराव नगर परिसरात असणाऱ्या आय सी आय सीआय बँकेचे एटीएम मशीन एटीएम चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सुचना करून अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मागदर्शनाखाली सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास करण्यात येत असताना सदर गुन्हा हा सोनु उर्फ शुभम दिलीप गायकवाड(रा.गोलेगाव ता.शिरुर,जि.पुणे)याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला मिळाली होती. गुप्त मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने सपोनि सचिन काळे,पो. हवा जनार्दन शेळके,पो.हवा.राजु मोमीण,पो.ना अजित भुजबळ,पो.ना.मंगेश थिंगळे,पो.कॉ.अक्षय जावळे असे पथकासह संशयित आरोपीस ताब्यात घेण्यासाठी शिरूर परीसरात थांबलेले असताना सोनु उर्फ शुभम दिलीप गायकवाड(रा.गोलेगाव,ता.शिरूर जि.पुणे)हा शिरूर येथील निर्माण प्लाझा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला मिळताच निर्माण प्लाझा,शिरूर येथे सापळा लावून त्यास मोठया शिताफिने जाळ्यात अडकून ताब्यात घेतले तसेच सदर प्रकाराची त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितले ती पुढील प्रमाणे १) मंगेश काळुराम गाडेकर(रा.मारूती आळी शिरूर,ता.शिरूर जि.पुणे) २) महेश सुरेश गुंजाळ, ३) निशांत पंडीत साळवे दोघे (रा.गोलेगाव,ता.शिरूर,जि.पुणे) यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. दरम्यान मंगेश गाडेकर हा देखील निर्माण प्लाझा,शिरूर येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाल्याने निर्माण प्लाझा, शिरूर येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपीकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे सोनु उर्फ शुभम दिलीप गायकवाड(वय- २१ वर्षे रा.गोलेगाव,ता.शिरूर जि.पुणे),मंगेश काळुराम गाडेकर(वय- २४ वर्षे,रा.मारुती आळी, राममंदिरा जवळ,शिरूर,ता. शिरूर,जि.,पुणे तसेच मुळगाव रा.आरणगाव दुमाला,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर) असे सांगितले आहे.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप चार चाकी व दोरखंड हस्तगत करण्यात आले असून आरोपींना मेडिकल तपासणी करून पुढील कार्यवाही साठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोसई पडळकर हे करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News