देऊळगाव गाडा कोविड सेंटरचे डॉ मनोज लडकत व डॉ राकेश वाघमोडे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान


देऊळगाव गाडा कोविड सेंटरचे डॉ मनोज लडकत व डॉ राकेश वाघमोडे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 कोरोना महामारीने संपूर्ण जग हैराण झावले आहे,अशावेळी डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,पोलीस या सर्वानीच योगदान दिले आहे, आणि त्या योगदानाचा कुठेतरी सन्मान झालाच पाहिजे,त्याच दृष्टीने दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील स्वर्गीय सुभाष आण्णा कुल चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने उभारण्यात आलेल्या देऊळगाव गाडा येथील डॉ मनोज लडकत आणि डॉ राकेश वाघमोडे यांना दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजनताई कुल यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल,कांचन कुल,तुकाराम ताकवणे, ज्ञानेश्वर ताकवणे,अशोक दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते,संपूर्ण देश कोविड 19 रोगप्रसार थांबवण्यासाठी लढा देत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पहिल्या फळीत भकंमपणे उभे राहून परिसरातील नागरिकांची सुरक्षितता तसेच कोविड रुग्णांची निस्वार्थ पणे केलेली सेवा,साहस,त्याग,समाजाप्रती दाखवलेली समर्पण भावना यासाठी कृतज्ञाता व्यक्त करताना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ लडकत व डॉ वाघमोडे यांनी या पुरस्काराचे श्रेय आमदार राहुल कुल,दौंड उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ संग्राम डांगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ,प्रशासक डॉ दिपक जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता वाघमोडे, सहकारी डॉ मिलिंद कांबळे यांना दिले.डॉ राकेश वाघमोडे  हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत,त्यांनी यापूर्वी कराटे जुडो या खेळात सुवर्णपदक मिळवली आहेत,त्यांचे एम बी बी एस चे शिक्षण मुंबईच्या प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन येथून झाले आहे,ते सध्या दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करीत  आहेत,आय ए एस अधिकारी बनून लोकसेवा व देशसेवा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला, तर डॉ मनोज लडकत यांनी अनेक ट्रस्ट च्या माध्यमातून समाजसेवा केली आहे,योग आणि आयुर्वेद याचे उत्कृष्ट तज्ञ आहेत,रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद उराशी बाळगून त्यांनी अनेक रुग्ण बरे केले आहेत,आणि या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नीचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ मनोज लडकत यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News