बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांचा सत्कार


बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांचा सत्कार

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांनी कोविड काळात बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चांगले काम केले असून त्यांच्या कामाची दखल म्हणून सातारा येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपा परगणा प्रमुख सुनील राजेभोसले व अखिल भारतीय मराठा महासंघाचे बारामती तालुका उपाध्यक्ष डॉ. सतीश राजेभोसले यांनी काकडे यांचा नुकताच पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. 

  कोविड काळात काकडे यांनी अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात बेडसाठी मदत, रेमडेसिवीर इंजेक्शन, लसीकरण याबाबतीतही मदत केल्याची माहिती यावेळी भोसले यांनी दिली.

   यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, खलाटे आण्णा, सतीश दगडे महाराज व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News