दिड दिवसाच्या शाळेपेक्षा शिक्षणाची ओढ समजून सांगावी -ॲड. नितिन पोळ


दिड दिवसाच्या शाळेपेक्षा शिक्षणाची ओढ समजून सांगावी -ॲड. नितिन पोळ

राजेंद्र तासकर कोपरगाव प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज बांधवांना सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची दिड दिवसाची शाळा सांगण्यापेक्षा त्यांच्यात असलेली शिक्षणाची ओढ समजाऊन सांगावी असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलन व समाज बांधवांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

त्या नंतर लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने करण्यात आलेल्या अभिवादन प्रसंगी बोलताना  नितीन पोळ पूढे म्हणाले की समाजातील विविध नेते कार्यकर्ते अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना अण्णा भाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले याचा संदर्भ देतात मात्र त्या नंतर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्यात असलेली शिक्षणाची ओढ व त्यातून स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अक्षर ओळख करून विविध कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, प्रवास वर्णन,पोवाडे, यांची निर्मिती करून दिन दलित कष्टकरी यांच्या दुःखाला जगाच्या व्यासपीठावर मांडले असून त्यांच्या कथा कादंबऱ्याचे अनेक भाषेत  भाषांतर झाले हे सर्व अण्णा भाऊं साठे यांच्या शिक्षणाच्या ओढीतून निर्माण झाले असून आजही समाज बांधव शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकला नाही मात्र या पुढे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी अण्णा भाऊ साठे यांची दीड दिवसाची शाळा सांगण्यापेक्षा त्यांच्यातील शिक्षणाची ओढ समजावून सांगून समाज बांधवांना शिक्षण घेण्याचा आग्रह करावा असे आवाहन केले

या वेळी विनोद राक्षे, नितीन साबळे,संदीप निरभवने यांनी मनोगत व्यक्त केले बोलताना महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे  दलित मित्र प्राप्त सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी आपल्या रसाळ वाणीतून अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ म्हस्के यांनी केले तर आभार सुजल चंदन शिव यांनी व्यक्त केले कार्यक्रमास सोमनाथ म्हस्के,बाळासाहेब पवार,मोनू म्हस्के, संजय तूपसुंदर,जयवंत मरसाळे सतीश रानोडे,सुखदेव जाधव बाळू सोळसे, संजय साळवे,आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News