कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत कुकडीच्या उन्हाळी आवर्तनांला झालेल्या विलंबा मुळे नुकसानग्रस्त फोंडे कुटुंबाला ११,१११ /रू ची मदत


कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे  समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत कुकडीच्या उन्हाळी आवर्तनांला झालेल्या विलंबा मुळे नुकसानग्रस्त  फोंडे कुटुंबाला ११,१११ /रू ची मदत

 मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी : मागील उन्हाळ्यात कुकडीच्या आवर्तनाला उशीर झाला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची झळ बसली होती. अशाच एका महिला शेतकऱ्यास कर्जत तालुका भाजपचे समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळून ११, १११ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, गणेश पालवे, प्रशांत आडसुळ, कृष्णा पोटरे, गणेश कवडे, आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना पप्पू शेठ धोदाड म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून कुकडीच्या उन्हाळी आर्वतनात होत असलेल्या विलंबाने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. दिनांक १० मे २०२१ रोजी प्रा. राम शिंदे हे उन्हाळी आवर्तनांच्या उशीरा च्या नियोजनामुळे पिक जळीत झालेल्या नुकसान ग्रस्त भागात भेटी देत होते. त्यावेळी कोळवडी येथील सौ राधिका पांडुरंग फोंडे या महिलेने कुकडी आवर्तन च्या विलंबा मुळे जळालेल्या घेवड्याचे पिक,  ऊसाच पिक, आणि तोट्यात चालेला दुध धंदा, गायींच्या चाऱ्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे लहान लहान मुल कशी जगवायची, ही व्यथा मांडत असताना डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली होती . अण् तोंडातून जड अंत करणाने शब्द काढले होते की "साहेब तुमच्या शिवाय काही खर नाही" या आर्त हाकेचा टाहो उपस्थितांच्या काळजाला भिडला होता . राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्त्वाचे स्थान देणारे  स्व: गोपिनाथराव मुंडे यांच्या  सावलीत वाढलेल्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे या नेतृत्वाच्या आदर्शातुनच आम्ही कार्यकर्ते चालण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो आहोत. म्हणून आज वाढदिवसाच्या  वायफळ खर्चाला फाटा देत कुकडी आवर्तनांच्या विलंबाने भाजलेल्या कुटुंबाला आर्थिक हात -भार लावावा ही संकल्पना आमलात आणली आणि फुल ना फुलाची पाकळी देण्याचे योगदान घडुन आले. हाच खऱ्या अर्थाने वाढदिवस म्हणावा  असे उद्गार धोदाड यांनी काढले.                                खरं तर  नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानव निर्मित संकट असो कुठल्याही कठीण प्रसंगी जनसामान्यांच्या हाकेला धावुन जाणे प्रा. राम शिंदे साहेब यांचा स्वभाव आहे. म्हणूनच त्यांनी करोणा काळात कर्जत जामखेड तालुक्यातील अंत्योदयच्या सर्व लाभार्थी कुटुंबांचा  महिण्याचा आर्थिक भार उचलण्याचे नियोजन केले . मात्र शासन आणि प्रशासन यांनी खोडा घालत अडथळा आणला होता मात्र साहेबांनी आम्हा कार्यकर्त्यां मार्फत सर्व लाभार्थी कुटुंबां पर्यत आर्थिक मदत यथायोग्य पोहचवली.  करोणा संकटात शिंदे साहेबांचा  भ्रमणध्वनी चोवीस तास सामान्य जनतेच्या मदतीसाठी  खनानल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीले आहे . पिडीत रुग्णांचे रात्री अपरात्री येणाऱ्या प्रत्येक फोनचा पाठपुरावा करताना जमेल ती मदत केली. मग ती बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमेडिसिव्हर इंजेक्शन, अथवा आर्थिकरीत्या साह्य देण्यासही कुठलीही कसर सोडली नाही. असे धोदाड यांनी म्हटले. मागेल त्याला जमेल ती मदत करणे साहेबांचा गुण आहे. मागील काही दिवसात अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यात मोठे नुकसान झाले. नुकसान ग्रस्त ठिकाणी आपला माणूस म्हणून शिंदे साहेब सर्वात अगोदर पोहचले आणि तेथील लोकांना आधार देऊन  प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश दिले. अस्या या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या सान्निध्यात राहत असताना आपल्या मनावर देखील त्यांच्या या वागण्याचा परिणाम होत असतो. त्यांच्या याच प्रेरणेतून आज वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत फोंडे कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा योग मिळाला.असे धोदाड यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News