लायन्स क्लब तर्फे कलाकारांना आर्थिक मदत.


लायन्स क्लब तर्फे कलाकारांना आर्थिक मदत.

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

पुणे - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब  इंटरनॅशनल पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे  फीड द हंगर या सामाजिक उपक्रमात पुणे नाट्य परिषद व  तीस ज्येष्ठ कलाकारांना मानधनाचे धनादेश देण्यात आले. अभिनेत्री, नृत्य दिग्दर्शक आणि भरतनाट्यम नृत्यांगना लायन तेजश्री अडिगे यांनी त्यांच्या नृत्य कला मंदीर संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमास उद्योजक माजी प्रांतपाल लायन दीपक शहा यांनी त्यांच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे एक लाख रु. दान केले. ज्येष्ठ अभिनेता  मिलिंद दास्ताने आणि लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन हेमंत नाईक यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ  नाट्य परिषद पुणे शाखा चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले  यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, रजनी भट, विद्या भगवत, मंजुश्री जोशी, अंजली जाखडे, भारती गोसावी, वर्ष संगमनेरकर, राजू जावळकर, चेतन चावडा, शाहीर दादा पासलकर, बाळू निकाळजे, जितेंद्र वाईकर, नयन महाजन, पूनम कुडाळकर, अर्चना जावळेकर, कुमार पाटोळे इत्यादी कलाकारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले.या प्रसंगी लायन रीतू नाईक, माजी प्रांतपाल दिपकभाई शाह, इतर पदाधिकारी प्रमिला वाळुंज, राजश्री शाह, लायन्स क्लब तळेगाव चे अध्यक्ष दीपक बाळसराफ,  प्रकल्प अधिकारी  लायन बलविंदर सिंह राणा  व लायन तेजश्री अडीगे तसेच पुणे नाट्य परिषदे कोषाध्यक्ष शशिकांत कोठावळे, बालगंधर्व परिवार उपाध्यक्ष योगेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News