पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची नविन कार्यकारीणी जाहिर.. दत्तात्रय भेगडे अध्यक्ष, दिपक कलापुरे कार्याध्यक्ष


पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची नविन कार्यकारीणी जाहिर.. दत्तात्रय भेगडे अध्यक्ष, दिपक कलापुरे कार्याध्यक्ष

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : पिंपरी, पुणे (दि. 18 जुलै 2021) पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची 2021 ते 2024 ची नविन कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. मावळते अध्यक्ष काळूराम आण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 16 जूलै) कोअर कमिटीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदावर आणि दिपक कलापुरे यांची कार्याध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. हेमंत भाऊ ढोरे यांनी 2007 साली स्थापन केलेल्या या नोंदणीकृत असोसिएशनचे पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाचशेहून जास्त सभासद आहेत. यामध्ये कंपनी कॉन्ट्रक्ट बस, स्कूल बस, पॅकेज बस आणि डेलीबस सर्व्हिस करणा-या वाहन धारकांचा समावेश आहे.

     मागील दिड वर्षापासून लॉकडाऊनमुळे या सर्व वाहनधारकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मावळते अध्यक्ष काळूराम आण्णा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनने शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे वाहन धारकांना करामध्ये सवलत मिळाली होती. परंतू ती तुटपुंजी असून आणखी अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी नविन कार्यकारीणी सदस्य प्राधान्याने प्रयत्न करतील असे नवनियुक्त अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दिपक कलापुरे यांनी सांगितले. 2021 ते 2024 च्या नुतन कार्यकारीणीवर भालचंद्र उर्फ बाळासाहेब बोराटे (उपाध्यक्ष); दिनेश भालेकर (सचिव); दशरथ पानमंद (खजिनदार); काळूराम आण्णा गायकवाड आणि प्रमोद बागलाने यांची सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News