मद्यधुंद अवस्थेत टेम्पो भरधाव चालवून अपघात करणाऱ्या चालकांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


मद्यधुंद अवस्थेत टेम्पो भरधाव चालवून अपघात करणाऱ्या चालकांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :  दौंड रस्त्यावर पाटस कडून दौंडकडे मालवाहतूक करणारा टेम्पो वाहनचालकाचा ताबा सुटल्यामुळे पुलाचा कठडा तोडून ओढ्यात पडल्याची घटना घडली आहे, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही,माध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने टेम्पो महामार्गावरून दौंडच्या दिशेने जोरात बाहेर काढून टोल नाक्याजवळील चौकात थांबलेल्या दुचाकी कशा बशा वाचवत हा नशेबाज वाहनचालक कोणाची ही पर्वा न करता भरधाव टेम्पो चालवीत आल्याची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शी बाळासाहेब पोपट भागवत यांनी दिली आहे,त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे तो ऐसार पंपाजवळ आल्यानंतर तो ओढ्यात टेम्पो पलटी झाला,त्याचा आवाज मोठा झाल्यामुळे उड्डाणपूल येथे विना मास्क,विना लायसन वाहन चालकांवर कारवाई करीत असलेले दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवा सुरेश चौधरी,पो ना विशाल जावळे,पो कॉन्स्टेबल अमजद शेख,अक्षय घोडके,आकाश शिंदे,होमगार्ड आणि तेथील स्थानिक नागरिकांनी वेळेत मदत केल्यामुळे वाहनचालक सिराज सिकंदर शेख वय 24 राहणार कुरकुंभ याला वाचवण्यात यश आले, त्याला खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, बेदरकार गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम 279,337,427मो वा का कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 

पुणे सोलापूर महामार्गावरून पाटस गावातून दौंड मार्गे सिद्धटेक कडे जाणारा मार्ग आहे या मार्गावरून पुढे अहमदनगर, औरंगाबाद कर्जत,राशीन कडे  जातो,परंतू पाटस ते सिद्धटेक हा अष्टविनायक मार्ग म्हणून रस्त्याचे काम सुरू आहे,दौंड शहराजवळ ऐसार पेट्रोल पंपाजवळ या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे, ओढ्याच्या पुलाजवळ आल्यानंतर तेथे काम थांबले आहे,त्याठिकाणी पुढे काम सुरू आहे असा माहिती फलक चुकीच्या बाजूला असल्याने  आणि पाटस बाजूने उतार जास्त आहे त्यामुळे अचानक खराब रस्ता आल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते आणि तेथे अपघात घडत आहेत, पावसामुळे वाहन चालवताना चालकांची दमछाक होते,त्या टेम्पो चालकाची तीच परिस्थिती झाली आणि  अचानक ब्रेक दाबल्यामुळे वाहन चालकाचा वाहनवरील ताबा सुटला आणि टेम्पो कठडा तोडून शेजारील ओढ्यात जाऊन पलटी झाला,तेथील नागरिक आणि पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले,त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तेथून जात होते त्यांनी गाडी थांबवून अपघाताची माहिती घेतली आणि रस्त्याबाबत ठेकेदारास योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे समजते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News