शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न बुरुडगांवचा पाणी प्रश्‍न शिवसेना सोडविणार -संभाजी कदम


शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न  बुरुडगांवचा पाणी प्रश्‍न शिवसेना सोडविणार -संभाजी कदम

बुरुडगांव येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, सुनिल लालबोद्रे, रवी लालबोंद्रे, अरुण शिंदे, जालिंदर कुलट, पारुनाथ ढोकळे, अभिषेक भोसले आदिसह शिवसैनिक. (छाया : राजु खरपुडे

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) मुखमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सुटले पाहिजे, यासाठी शिवसैनिकांनी कामे करावेत. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. तसेच शिवसैनिकांची फळी उभी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले बळ वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. शिवसेना आपल्या पाठिशी उभी राहील. बुरुडगांव मधील प्रश्‍नांसाठी शिवसेनेने आवाज उठवावा ते सोडविण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर राहू. त्याचप्रमाणे बुरुडगांवचा पाणी प्रश्‍न महत्वाचा असून, हा प्रश्‍न मार्गी लावू, असे प्रतिपादन माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

    बुरुडगांव येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, सुनिल लालबोद्रे, रवी लालबोंद्रे, अरुण शिंदे, जालिंदर कुलट, पारुनाथ ढोकळे, अभिषेक भोसले, गोयल, वाघ, मोढवे, टिमकरे आदि उपस्थित होते.याप्रसंगी शहरप्रमुख दिलिप सातपुते म्हणाले, शिवसेनेच्या संपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचे संघटन करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. पक्षिय पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुरु आहे. आपणही आपल्या भागातील प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्याचप्रमाणे शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.


     याप्रसंगी अरुण शिंदे यांनी प्रास्तविकात बुरुडगांव मध्ये शिवसेनेचे चांगले काम सुरु असून, गावातील प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसैनिक पुढाकार घेत असल्याने गावकरीही शिवसेनेच्या मागे उभे आहेत. बुरुडगांवचा पाण्याचा महत्वाचा प्रश्‍न असून, तो सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे सांगून आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. तर अभिषेक भोसले यांनी आभार मानले. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News