सर्प मित्र पत्रकार शेरखान शेख यांची सामाजिमुख दमदार कामगिरी


सर्प मित्र पत्रकार शेरखान शेख यांची सामाजिमुख दमदार कामगिरी

शिक्रापूर येथील बजरंग वाडीत बुटात लपून बसलेला साप मोठया शिताफिने काढला बाहेर

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )      

        जून महिना म्हणजे पावसाळाचं या पावसाळ्याचे दिवस सुरु असताना जमीन वरून गार होते परंतु जमिनीत्याला आत असलेल्या उपद्र्यावी हानी कारक जीव घेणे अन्य विषारी जीव जंतू सह साप देखील बाहेर पडतात व आपल्या घरात नव्हे तर सर्वत्र पसरतात यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे असे सर्प मित्र पत्रकार शेरखान शेख यांनी सांगितले.

        


     शिक्रापूर येथील बजरंग वाडीत बुटात लपून बसलेला साप मोठया शिताफिने काढला बाहेर काढताना यावेळी दिलेली प्रतिकिया दत्तात्रय सूर्यवंशीयांनी काल सायंकाळी सात वाजता बजरंग वाडी येथून पत्रकार शेरखान शेख यांना फोन वरून सांगितलं की,आमच्या घराच्या दारात मुलाचे बुटामध्ये साप दिसतोय मुलं घाबरलीत लवकर या तुम्ही पण मी कामात असल्याने श्रीकांत भाडळे याला कॉल केला तर त्याने सांगितले मी व शुभम गावात साप पकडायला आलो आहे सांगितलं त्यानुसार लगेचच मी सूर्यवंशी यांच्या घरी गेलो असता त्यांनी सांगितलेल्या बुटात काडीने हलवून पाहिले तर त्यामध्ये विषारी नागाचे पिल्लु दिसून आले असलेतरी ते पकडण्यात आले आहे

     सद्या तरी पावसाचे दिवस सुरु झाले असताना अनेक ठिकाणी सापांची पिल्ले जन्माला येतात हे तुम्हालाचं काय? सर्वांना माहिती आहे.नुकतीच जन्मलेली पिल्ले आसरा घेण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात मिळेल तिथे लपण्यासाठी इतरत्र मिळेल त्या ठिकाणी जागा शोधत जाऊन लपतात. आपण आपली काळजी घ्यावी असे आव्हान सर्पमित्र /पत्रकार शेरखान शेख यांनी केले.

       सद्याच्या परिस्थितीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे.साप आढळून आल्यास आम्हा सर्पमित्रांना संपर्क करा.9822698386/8796800880/9096298181आपला – सर्पमित्र /पत्रकार शेरखान शेख शिक्रापूर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News