कर्जत येथे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकां साठी शिवसंपर्क अभियान ना शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संपन्न


कर्जत येथे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकां साठी शिवसंपर्क अभियान ना शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संपन्न

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :

शिवसंपर्क अभियान म्हणजे सर्वसामान्य नागरिकामध्ये जाऊन त्यांच्या अडी-अडचणी, आणि समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे त्यांना दिलासा देण्याचे काम या अभियाना अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष करीत आहे. संघर्ष म्हणजे खरा शिवसैनिक सर्वासमोर उभा राहतो याचा प्रत्यय शिवसेना पक्षातच आहे. समोर बसलेल्या खऱ्या शिवसैनिकामुळेच पक्ष बळकटीला लागला आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी केले. ते कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयातील शिवसंपर्क अभियान प्रसंगी बोलत होते. यावेळी नगर जिल्ह्य़ाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, संपर्क प्रमुख विजय पाटील, सुनील वाकळे, तालुका प्रमुख बळीराम यादव, जामखेडचे संजय काशीद, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, मिरजगावचे माजी उपसरपंच अमृत लिंगडे, महिला आघाडीच्या संघटक म्हस्के, चंदनबाला बोरा, सुनिता हिरडे सह  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          यावेळी पुढे बोलताना ना. शंकरराव गडाख म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक खऱ्या आणि संघर्ष केलेल्या शिवसैनिकाला महाविकास आघाडीत मानाचे स्थान मिळणारच आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकानी पक्षाचे कार्य, व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहच करण्याची जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कार्य पाहता ते प्रत्येक विभागाच्या मंत्र्याशी वार्तालाप करूनच निर्णय घेत असल्याने त्यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रथमस्थानी आहे. कोरोना महामारीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेने देखील त्यांचे कौतुक केले आहे. आगामी काळात पक्ष वाढीसाठी सर्वानी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडावे असे म्हणत नियुक्त केलेल्या नुतन पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

                     यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की, राज्यात शिवसेनाचा मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागात शिवसैनिकानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य घराघरात पोहचवले पाहिजे. देशात कोरोना सारख्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट काम केले असून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मिळालेले स्थान सर्व शिवसैनिकासाठी कौतुकास्पद आहे. युवकांनी देखील युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य तरुणाईमध्ये पोहचण्याची जबाबदारी पार पाडावी. 

     याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा महिला संघटक सुनीता हिरडे,  जामखेडचे शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद, माजी उपसरपंच अमृत लिंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसैनिकाना आ रोहित पवार यांनी त्यांच्या कार्यक्रमात मानाचे स्थान देत सन्मान करावा अशी मागणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी नवले यांनी केले तर आभार सावता हजारे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. 


 - शिवसेनेचे जेष्ठ नेते बळीराम यादव यांची पुन्हा  कर्जतच्या शिवसेना तालुकाप्रमुखपदी निवड

यावेळी करण्यात आली. कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा, आणि घर तेथे शिवसैनिक यासाठी तालुक्याची महत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा सेनेचे जेष्ठ नेते व माजी तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या  नियुक्तीचे पत्र ना. शंकरराव गडाख यांनी शिवसंपर्क अभियानात बळीराम यादव यांच्या कडे सुपूर्त केले . पक्ष वाढीसाठी यादव निश्चितच जोमाने प्रयत्न करतील असा विश्वास ना. गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News