दौंड पाटस रस्त्यावर अपघात,माहिती फलक नसल्यामुळे टेम्पो पुलावरून पडला ओढ्यात


दौंड पाटस रस्त्यावर अपघात,माहिती फलक नसल्यामुळे टेम्पो पुलावरून पडला ओढ्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड रस्त्यावर पाटस कडून दौंडकडे मालवाहतूक करणारा टेम्पो वाहनचालकाचा ताबा सुटल्यामुळे पुलाचा कठडा तोडून ओढ्यात पडल्याची घटना घडली आहे, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, पुणे सोलापूर महामार्गावरून पाटस गावातून दौंड मार्गे सिद्धटेक कडे जाणारा मार्ग आहे या मार्गावरून पुढे अहमदनगर, औरंगाबाद कर्जत,राशीन कडे  जातो,परंतू पाटस ते सिद्धटेक हा अष्टविनायक मार्ग म्हणून रस्त्याचे काम सुरू आहे,दौंड शहराजवळ ऐसार पेट्रोल पंपाजवळ या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे, ओढ्याच्या पुलाजवळ आल्यानंतर तेथे काम थांबले आहे,त्याठिकाणी पुढे काम सुरू आहे असा माहिती फलक नसल्यामुळे आणि पाटस बाजूने उतार जास्त आहे त्यामुळे अचानक खराब रस्ता आल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते आणि तेथे अपघात घडत आहेत, पावसामुळे वाहन चालवताना चालकांची दमछाक होते,त्या टेम्पो चालकाची तीच परिस्थिती झाली आणि माल भरलेला असल्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यामुळे वाहन चालकाचा वाहनवरील ताबा सुटला आणि टेम्पो कठडा तोडून शेजारील ओढ्यात जाऊन पलटी झाला,तेथील नागरिक आणि पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले, तो किरकोळ जखमी झाला आहे, अशी प्रतक्षदर्शीनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News