दौंड येथील शिक्षक सागर गावडे याना अजित पवार यांच्याहस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान


दौंड येथील शिक्षक सागर गावडे याना अजित पवार यांच्याहस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड येथील जनता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व ALL INDIA ABACUS PVT LTD COMPANY ISO (9001:2015) चे संस्थापक श्री सागर हिराचंद गावडे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरू गौरव शिक्षक रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती,जिल्हा पुणे येथे देण्यात आला.

         शालेय स्तरावर विविध उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन दर्जेदार अध्यापन,गुणवत्ता तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड व शिक्षकांना अबॅकस शाखा रोजगार संधी व प्रशिक्षण तसेच पालकांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले या सर्वांची दखल घेऊन हा पुरस्कार वितरित करण्यात आला मागील वर्षी ज्येष्ठ समाजसेविका माननीय डॉक्टर सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देण्यात आला होता.या कार्यक्रमावेळी श्री.अजित दादा पवार यांनी आपल्या भाषणातून शाबासकीची थाप देऊन गौरव उदगार काढले व जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक श्री.सागर गावडे सरांनी अबॅकसच्या माध्यमातून घडवावेत असे सांगितले,सागर गावडे यांचेवर  या पुरस्कारामुळे संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News